बॅंक ऑफ महाराष्ट्रने नोंदवला 81 कोटींचा नफा

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

पुणे: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रला जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत 81.10 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बॅंक ऑफ महाराष्ट्रने 1,119 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. बॅंकेचे एकूण उत्पन्न 2,987.10 कोटी रुपयांवरून 3,191.88 कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकेचे एकूण थकित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 21.18 टक्क्यांवरून कमी होऊन 17.90 टक्क्यांवर आले आहे. तर निव्वळ थकित कर्जाचे प्रमाण 12.20 टक्क्यांवरून 5.98 टक्क्यांवर आले आहे. 

जूनअखेर बॅंकेवर एकूण 16,649.58 कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. जून 2018 अखेर बॅंकेवर 17,800.30 कोटी रुपयांचे थकित कर्ज होते. निव्वळ थकित कर्जसुद्धा 9,195.01 कोटी रुपयांरवरून 4,856.27 कोटी रुपयांवर आले आहे. थकित कर्ज आणि आपत्कालीन खर्चासाठीची तरतूदीतही त्यामुळे घसरण होते ती 1,632.88 कोटी रुपयांवरून 920.71 कोटी रुपयांवर आली आहे.

आज दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात बॅंक ऑफ महाराष्ट्रचा शेअर 14.15 रुपये प्रतिशेअर या पातळीवर होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank of Maharashtra clocks ₹81 crore profit in June quarter