बॅंक ऑफ महाराष्ट्रला तिमाहीत 130 कोटींचा नफा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

बॅंकेचा एकूण व्यवसाय वाढून तो 2 लाख 62 हजार 34 कोटी इतका झाला आहे. गेल्यावर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 12.53 टक्के तर मागील तिमाहीच्या तुलनेत 4.98 टक्के वाढ झाली आहे. 

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने या तिमाहीमध्ये 130 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बॅंकेचा एकूण व्यवसाय वाढून तो 2 लाख 62 हजार 34 कोटी इतका झाला आहे. गेल्यावर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 12.53 टक्के तर मागील तिमाहीच्या तुलनेत 4.98 टक्के वाढ झाली आहे. 

बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, नागेश्‍वर राव वाय उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजीव म्हणाले की, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचा निव्वळ नफा गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 13.44 टक्के तर मागील तिमाहीच्या तुलनेत 28.75 टक्के वाढून 130 कोटी रुपये इतका झाला. कार्यान्वय नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 13.47 टक्के वाढून 806 कोटी झाला आहे. व्याजाचे निव्वळ उत्पन्न (मिळवलेले व्याज वजा दिलेले व्याज) यामध्ये गेल्यावर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 4.38 टक्के वाढ होऊन ते 1120 कोटी झाले. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एकूण ठेवींमध्ये गेल्यावर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 12.15 टक्के वाढ होऊन त्या 1 लाख 58 हजार 626 कोटी इतक्‍या झाल्या आहेत. एकूण कर्जामध्ये गतवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 13.13 टक्के वाढ होऊन ती 1 लाख 3 हजार 408 झाली. निव्वळ कर्जांमध्ये गेल्यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 21.31 टक्के वाढ होऊन ती 97 हजार 511 कोटी झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बॅंकेच्या नवीन उपक्रमाबाबत माहिती देताना राजीव म्हणाले, ""बॅंकेने 16 सप्टेंबरला स्वत:च्या क्रेडिट कार्डचा आरंभ केला. क्रेडिट कार्ड हे नवीन ग्राहकांसाठी प्रमुख प्रवेशद्वार आहे. बॅंकेने 31 मार्च 2021 पर्यंत 50 हजार कार्ड व पुढील पाच वर्षात 5 लाख कार्डांचे लक्ष निर्धारित केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank of Maharashtra makes a quarterly profit of Rs 130 crore

Tags
टॉपिकस
Topic Tags: