Car Loan : ‘या’ बँकांमध्ये आहे सर्वात स्वस्त कार लोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car loan

Car Loan : ‘या’ बँकांमध्ये आहे सर्वात स्वस्त कार लोन

सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिने कार खरेदीदारांसाठी खूप महत्वाचे राहिले आहेत. सप्टेंबर महिन्यात नवरात्री आणि दसरा हे सण असतात.  धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज हे सण ऑक्टोबर महिन्यात साजरे केले जातात. या दोन महिन्यात मोठे शुभ मुहूर्त असल्याने या महिन्यांत कार खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बँकांनीही विविध उत्सव योजना सुरू केल्या. या योजनांतर्गत, ग्राहकांना 7.9% ते 8.45% पर्यंत व्याजदर मिळत आहेत. तुम्हीही येत्या काही दिवसांत कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात कमी व्याजदरात कार कर्ज देणार्‍या बँकांची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Exchange Notes : तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत का? ‘अशा’ बदलता येतील नोटा

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना केवळ 8.05% व्याजदराने कार कर्ज देत आहे. हा व्याजदर रुपये 15,611 च्या हप्त्यावर (EMI) वर उपलब्ध आहे.

देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एच.डी.एफ.सी बँक (HDFC) बँक आपल्या ग्राहकांना 7.9% व्याजदर देत आहे. हा व्याजदर 10 लाख रुपयांच्या कर्जावर उपलब्ध आहे.

हेही वाचा: Keyboard Invention : कीबोर्डचा शोध कधी आणि कोणी लावला? वाचा काय आहे इतिहास

आयसीआयसीआय (ICICI) बँकेला 10 लाख रुपयांपर्यंतच्या कार कर्जावर 8.25% व्याजदर मिळत आहे. हा व्याज दर 15,711 रुपयांच्या हप्त्यावर (EMI) वर उपलब्ध आहे.

बँक ऑफ इंडिया (BOI) आपल्या ग्राहकांना 8.3% आणि पंजाब नॅशनल बँक 8.35% व्याजदराने कार कर्ज देत आहे. हा व्याजदर 15,761 रुपयांच्या हप्त्यावर (EMI) वर उपलब्ध आहे.