आणखी तीन बॅंकांना ‘पीसीए’तून वगळले

वृत्तसंस्था
Wednesday, 27 February 2019

मुंबई - त्वरित सुधार आराखड्याअंतर्गत (प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ॲक्‍शन) निर्बंध घातलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील ८ बॅंकांपैकी अलाहाबाद बॅंक, कॉर्पोरेशन बॅंक आणि धनलक्ष्मी या तीन बॅंकांना काही अटींच्या आधारे रिझर्व्ह बॅंकेने मुक्‍त केले. यापूर्वी बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या तीन बॅंकांवरील निर्बंध दूर केले होते. यामुळे या तीनही बॅंकांचा कर्जवितरणाचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्राने नुकताच सार्वजनिक बॅंकांना भांडवल भरणा केला. ज्यात अलाहाबाद बॅंक ६ हजार ८९६ कोटी व कॉर्पोरेशन बॅंकेला ९ हजार ८६ कोटी मिळाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank PCA