१० हजारात सुरु करा स्वतःचा व्यवसाय; पहिल्याच महिन्यात कमवाल २५ ते ३० हजार रुपये

Sakal
SakalSakal

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत देशातील व्यवसाय वाढीस सरकारकडून चालना देण्यात येत आहे. सरकारचा सध्याचा पूर्ण फोकस हा 'व्होकल फॉर लोकल' म्हणजे भारतात तयार होणाऱ्या गोष्टींवर आहे. 'मेड इन इंडिया' गोष्टींना जगभरात कसं पोहोचवता येईल यावर मोदी सरकार लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळतंय. अशात तुम्ही स्वतः एखादा व्यवसाय सुरु करायच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. यामुळे तुम्ही नोकरी शोधण्यापेक्षा इतरांना नोकरी देऊ ही शकतात. सरकारने अशा स्टार्टअप्ससाठी विविध योजना राबवल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक कुशल बनवण्यावर भर दिला जातो. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. या बातमीतून आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही इतरांना नोकरी देऊ शकाल. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यास जास्त पैशांची गरज नाही. (Be ‘Atmanirbhar’ and Start a Profitable Pickle Business)

Sakal
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय, जर 'असं' असेल तर तुमचे गुंतवले पैसे काढताच येणार नाहीत..

९०० चौरस फुटांची जागा हवी

लोणचं बनवण्यासाठी तुम्हाला साधारण ९०० चुरस फुटांची गरज भासते, यामध्ये लोणचं तयार करणे, लोणचं सुकवणे, त्याचं पॅकिंग या सर्व बाबींचा समावेश होतो. तयार केलेलं लोणचं खराब होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी ते बनवलं जातं तिथे साफसफाई आणि स्वच्छतेची गरज असते.

फायद्याचा व्यवसाय

लोणचं बनवण्याच्या व्यवसायात कमी भांडवलात तुम्ही डबल नफा कमावू शकतात. सुरवातीला तुमचा मार्केटिंसाठी केलेला खर्च निघतो आणि नंतर निव्वळ नफा साचत जातो. तुम्ही या व्यवसायात मेहनतीने काम केलं आणि नवनवीन प्रयोग केलेत तर तुमचा नफा दिवसेंदिवस वाढत जातो.

कसं काढाल लायसन्स

लोणचं बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी लायसन्सची आवशयकता भासते. यासाठी फूड सेफ्टी अँड अथॉरिटी म्हणजेच (FSSAI) कडून लायसन्स घ्यावं लागतं. त्यासाठी तुम्ही FSSAI च्या संकेत स्थळावर जाऊन लायसन्स काढू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com