'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का?
'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का ?

'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Best Midcap Stocks: मिडकॅप शेअर्समध्ये कायमच चांगली तेजी दिसून येते. BSE वरील मिडकॅप निर्देशांक 150 हून अधिक अंकांनी मजबूत होऊन सोमवारी 26529 च्या पातळीवर पोहोचला. मिडकॅप निर्देशांक पुन्हा त्याच्या विक्रमी उच्चांकी 27246 कडे वाटचाल करत आहे. सध्या, मिडकॅप प्रकारात मजबूत तेजीनंतरही, अनेक चांगले शेअर्स आहेत जे यापुढेही दमदार परतावा देतील. यात एनसीसी लिमिटेड (NCC Ltd), वेस्ट कोस्ट पेपर (West Coast Paper), झेन्सर टेक (Zensar Tech), डिशमॅन कार्बोजन (Dishman Carbogen), गती (Gati) आणि क्रिसिल (CRISIL) यांचा समावेश आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी ही लिस्ट तयार केली आहे.

- विकास सेठी

लॉन्ग टर्म: एनसीसी लिमिटेड (NCC Ltd)

विकास सेठी यांनी लॉन्ग टर्मसाठी एनसीसीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 110 रुपयांचे टार्गेट दिले आहे. शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी आहे. ही कंपनी इन्फ्रा सेक्टरमध्ये काम करते. सध्या त्यांच्याकडे 30 हजार कोटींची ऑर्डर बुक आहे. सप्टेंबर तिमाहीचे निकाल अतिशय चांगले आहेत. त्यांचे अनेक प्रकल्प रोल टोल आहेत. शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे.

विकास सेठी पोझिशनल निवड म्हणून वेस्ट कोस्ट पेपरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या शेअरसाठी 295 रुपयांचे टार्गेट दिले आहे. तर 255 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. हा एक पेपर शेअर आहे. सध्या पेपर सेक्टर चांगले काम करत आहे. अनलॉकमुळे या सेक्टरचा आऊटलूक मजबूत झाला आहे. चीनमध्ये कागदाच्या किमती वाढल्याचा फायदा भारतीय कंपन्यांनाही होणार आहे.

शॉर्ट टर्म: झेन्सार टेक (Zensar Tech)
विकास सेठी यांनी झेन्सार टेकमध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी त्यांनी 505 रुपयांचे टार्गेट दिले आहे. तर 470 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ही एक आयटी कंपनी आहे. कंपनीचे अनेक मोठ्या कंपन्यांशी टाय-अप आहेत. तिमाही निकाल चांगले आले आहेत.

- राजेश पालविया

लॉन्ग टर्म: डिशमन कार्बोजेन (Dishman Carbogen)
राजेश पालवियांनी डिशमन कार्बोजेनमध्ये गुंतवणूक सल्ला दिला आहे. त्यांनी या शेअरसाठी 270 रुपयांचे टार्गेट दिले आहे. तर 190 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून या स्टॉकमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे.

पोझिशनल: गती (Gati)
राजेश पालवियांनी गतीमध्‍ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी त्यांनी 220 ते 230 रुपयांचे टार्गेट दिले आहे. तर 155 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये 4 आठवड्यांपासून सतत चांगली हालचाल दिसून येत आहे.

शॉर्ट टर्मसाठी राजेश पालवियांनी क्रिसिलमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. त्यांनी या शेअरसाठी 3430 रुपयांचे टार्गेट दिले आहे. तर 3200 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top