esakal |  शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ : जॉर्ज हेबर जोसेफ
sakal

बोलून बातमी शोधा

Best time to invest your money in share market says George Heber Joseph

सध्याच्या स्थितीत शेअर बाजार कमालीच्या अनिश्चिततेतून जात आहे. तेजी आणि घसरणीच्या वातावरणात उद्या काय याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. त्यामुळे शेअरबाजारातून बाहेर पडण्यासाठी गुंतवणूकदारांची जणू काही झुंबड उडाल्याचे चित्र आहे.

 शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ : जॉर्ज हेबर जोसेफ

sakal_logo
By
मुकुंद लेले

पुणे: कोरोना महामारीच्या वातावरणात शेअरबाजाराने मोठी पडझड अनुभवली मात्र त्यात आता सुधार होत असून बाजार येथून पुन्हा उसळीच्या दिशेने आपली पावले टाकत आहे. सध्याच्या स्थितीत शेअर बाजार कमालीच्या अनिश्चिततेतून जात आहे. तेजी आणि घसरणीच्या वातावरणात उद्या काय याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. त्यामुळे शेअरबाजारातून बाहेर पडण्यासाठी गुंतवणूकदारांची जणू काही झुंबड उडाल्याचे चित्र आहे. शेअरबाजारातील ही घसरण केवळ मिड आणि स्मॉल कॅप किंवा विशिष्ट क्षेत्रांपुरतीच मर्यादीत नाही. तर सर्वच निर्देशांक किंवा क्षेत्रात लाल रंग नजरेस प़डत आहे.

शेअरबाजार हा नेहमी भविष्याचा वेध घेतो आणि दीर्घ मुदतीसाठी थांबण्याची तयारी असणारे स्मार्ट गुंतवणूकदार अशा स्थितीतच आपला पैसा बाजारात गुंतवतात. आम्ही देखील तीन ते पाच वर्ष मुदतीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणाऱ्या स्मार्ट गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचा सल्ला देऊ इच्छितो. स्मार्टपणे पैसे कमविणाऱ्या गटात सामील होण्याची ही अनोखी संधी आहे.

घसरणीच्या कारणांना सध्या तीन पदर आहेत आणि ते असेः

• कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम आणि त्यामुळे विविध अर्थव्यवस्थांवरील परिणामांबाबत अनिश्चितता आहे.

• कोरोनाच्या विषाणूवर मात करणारे औषध अथवा इंजेक्शन अद्यापपर्यंत शोधले गेलेले नाही.

• खनिज तेलाच्या किंमती गेल्या एक महिन्यात तब्बल 60 टक्क्यांनी घसरल्या असून जगभर आर्थिक मंदीची लाट त्याचबरोबर विविध अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

आयटीआय म्युच्यूअल फंडांचा सर्व गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला

सध्याच्या चिंताजनक स्थितीत तुमच्या कानावर सतत नकारात्मक बातम्या येत आहेत मात्र त्याचा विचार न करता बातम्यांच्या / हेडलाईन्सच्या पलिकडे जात विचार केला पाहिजे. शिस्तबध्द पध्दतीने गुंतवणूक, दीर्घकालीन मुदतीचे उद्दीष्ट ठेवणे, गुंतवणूकीचा विस्तार आणि क्षेत्र याबाबत जागरूक असणे आणि अस्थिर स्थितीत मन शांत आणि स्थिर ठेवणे ही दीर्घकालीन गुंतवणूकीच्या यशाची काही सुत्रे आहेत. (त्यामुळे दीर्घकालीन मुदतीत आमचे फंड जोखीम सांभाऴत चांगला परतावा देण्याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे.)

 पुढील तीन ते पाच वर्षासाठी आयटीआय फंडाचा दृष्टीकोन

• शेअरचे मुल्य वाढत असल्याने गुंतवणुकीसाठी शेअर हे मालमत्ता निर्मितीचे उत्कृष्ट साधन असून दीर्घकालीन मुदतीत उत्तम परतावा देण्याची त्यांच्यात क्षमता असते.

• स्मॉल कॅप शेअरवर जास्तीत जास्त परतावा मिळणार असून त्यानंतर मिड-कॅप आणि लार्ज कॅपचा क्रमांक लागणार आहे.

• पुढील  एक, तीन आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी स्मॉल कॅप शेअरमध्ये लार्ज कॅपच्या तुलनेत अधिक फरकाने परतावा देण्याची क्षमता दिसत आहे.

• दशकातील ही सवोत्तम संधी आहे. मुलभूत घटक हे बळकट असून बाजाराचे मुल्य हे दोन दशकातील सर्वाधिक अल्प पातळीवर आलेले असल्याने ही संधी गुंतवणूकीसाठी अतिशय उत्तम संधी आहे.

• उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्व जण अशा स्थितीतही स्वतःला सज्ज करु शकतात. बाजाराची तळपातळी कोणती आणि कोरोना विषाणूचे परिणाम किती आणि कायकाय होणार याबाबत कोणालाच थांगपत्ता लागत नसला तरी भविष्यातील सोनेरी दिवसांसाठी आपण सर्व जण स्वतःला सिध्द करु शकतात. आता गुंतवणूक करत यशासाठी पुढील काही वर्षांसाठी प्रतीक्षा करणे हाच उत्तम यश पदरात पाडून घेण्याचा योग्य मार्ग होय.

गेल्या तीन दशकातील गुंतवणूकीतून चार बाबी शिकण्यास मिळालेल्या असून त्या पुन्हा योग्य, कालसुसंगत ठरलेल्या आहेत. त्या पुढीलुप्रमाणे :

•  गुंतवणूक मूल्याचा सन्मान कराः  बाजारमुल्य ज्यावेळी अतिशय आर्कषक असतात त्यावेळी सध्याची अर्थव्यवस्था / बाजाराची स्थिती लवकरच पुर्ववत होईल, अशी धारणा तुम्ही बाळगतात. सध्या शेअरबाजाराचे सर्व निर्देशांक हे जागतिक आर्थिक पेचप्रसंगावेळच्या निर्देशाकांशी ताडून पाहिले असता त्यापेक्षाही अधिक तळपातळीवर आहेत.

•  उसळीचे संकेत शोधाः  सध्याच्या स्थितीत बाजाराच्या उसळीचे संकेत शोधा. ज्यावेळी किंमत मुल्य हे अधिक महागडे असते त्यावेळी घसरणीचे संकेत शोधले पाहिजेत.

•  भितीदायक वातावरणात बाजार तळपातळी गाठून पुन्हा सरसावतो आणि आशेच्या लाटेवर स्वार होत उसळी मारतो. अस्थिरतेच्या गुंतागुंतीत बाजार हा तळपातळी गाठूनच भरारी घेतो. त्यामुळे बाजारातील सध्याच्या कोलाहलाकडे दुर्लक्ष करत दीर्घकालीन गुंतवणूकीवर लक्ष केंद्रीत करणेचे उचित होय.

• मोठा परतावा मिळविण्यासाठी तेजीचा फुगा फुटल्यानंतर गुंतवणूक आणि तेजी ऐन भरात असताना विक्री हेच तत्व महत्वाचे आहे. वॉरन बफे, सेथ क्लॅरमन, चार्ली म्युनगेर, बेंजामिन ग्रॅहम यासारख्या दिग्गज गुंतवणूकादारांकडून हीच शिकवणूक देण्यात आलेली आहे. आता आपण तेजीचा फुगा पुर्णपणे फुटलेल्या बाजाराची स्थिती अनुभवत असून खरेदी करण्यासाठी हाच सर्वोत्तम कालावधी आहे.

आनंदाने गुंतवणूक करा आणि सुरक्षित रहा”.

भितीच्या वातावरणात गुंतवणूकदार अशा चुका करतात की ज्या नेहमीच्या वेळी त्यांच्याकडून झाल्याच नसत्या. 2008 मधील लेहमन पेचप्रसंगापेक्षा आत्ताच्या काळात हेल्थ आणि वेल्थ अशा दोन्ही पातळ्यांवर चिंतेचे ढग दाटलेले असल्याने घबराट अधिकच वाढलेली आहे.

गुंतवणूकदारांनी सध्याच्या स्थितीत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत :

• अयोग्य वेळी आपली आयुधे फेकून देऊ नका : आपली गुंतवणूक काढून घेण्याची ही योग्य वेळ अजिबात नाही. शांत रहा आणि स्मार्ट गुंतवणूकदाराप्रमाणे गुंतवणूक करत रहा अथवा तळपातळीला तुमची गुंतवणूक दुप्पट करा.

• जोखीम आणि अस्थिरता यांची सरमिसळ करु नका : बाजारमुल्य ज्यावेळी उच्चतम पातळीवर असते त्यावेळी गुंतवणूकीतील जोखीम ही अधिक असते. अशा वेळी भांडवल कायमस्वरुपी गमावण्याचा धोकाही तितकाच असतो. आजच्या स्थितीत बाजारमुल्य हे अतिशय आकर्षक पातळीवर असून तुलनात्मक जोखीम ही अतिशय कमी असल्याने गुंतवणूकदारांसाठी हे अनुकूल वातावरण आहे. अतिशय कमी कालावधीत बाजारातील वेगवान बदल म्हणजेच अस्थिरता असून दीर्घकालीन गुंतवणूकादारांसाठी ती चिंतेची बाब अजिबात ठरु शकत नाही.

• प्रत्येक पेचप्रसंगावेळी बाजाराचे नेतृत्व हे बदललेले आहे : आधीच्या बाजारचक्रात ( गेल्या दशकात ) जे नाणे खणखणीत चालले तेच बाजाराच्या पुढील कालचक्रात बहुतांश वेळा चालू शकत नाही. यापुर्वी आम्ही अनेकदा पाहिले आहे की, ज्या क्षेत्राची चमक उतरली आहे, ते लवकर गतवैभव मिळवू शकलेले नाही.

• अफवा, कानोकानीच्या गोष्टी अथवा चुकीच्या गृहीतकांच्या आधारे निणय घेऊ नका : मुलभूत बाबी, मुल्यांकन, धारणा आणि उसळीचे संकेत या मुलभूत बाबांशी एकनिष्ट रहा. लोकसंख्या विषयक घटकांमुळे भारत अद्यापही जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून अर्थव्यवस्थेचे मुलभत घटक आजच्या घडीसही सुस्थितीत आहेत.  
 

loading image
go to top