बाजारभाववाढीचा फुगवटा? 

भूषण गोडबोले 
Monday, 6 July 2020

शॉर्ट टर्ममध्ये बाजारभावाला प्राधान्य असते. मात्र लाँग टर्ममध्ये कंपनीच्या परफॉर्मन्सप्रमाणेच शेअरची वाटचाल होत असल्याचे लक्षात येते. ज्या प्रमाणात कंपनीच्या मिळकतीमध्ये वाढ होत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेला खीळ बसवणाऱ्या कोरोनावर औषध किंवा लस मिळण्याबाबत जागतिक स्तरावर सकारात्मक बातम्या येऊ लागल्याने; तसेच जागतिक अर्थव्यवस्था लॉकडाउनमधून अनलॉकडाउनकडे सरकत असल्याने भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मागील आठवड्यात जोरदार तेजी दर्शविली आहे. 

आगामी काळात धोरण काय असावे? 
सर्वप्रथम बाजाराचे व्हॅल्युएशन प्राईझ अर्निंग रेशोनुसार २७ पेक्षा जास्त असल्याने बाजार महाग झाल्याचे लक्षात येत आहे. अर्निंग रेशोनुसार बाजार केवळ ३. ७ टक्के परतावा (अर्निंग यिल्ड) दर्शवत आहे, जो बँकेतील मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी आहे. 
आगामी कालावधीत लॉकडाउनच्या परिणामामुळे कंपन्यांच्या जाहीर होणाऱ्या तिमाही निकालात कंपन्यांच्या अर्निंगमध्ये घसरण होणे अपेक्षित आहे. तसेच अनलॉकडाउननंतर देखील कंपन्यांच्या अर्निंगमध्ये सुधारणा होण्यास किंवा मिळकत पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे. या सद्य:स्थितीचे भान ठेवणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

काय बघायला हवे? 
कोरोनापूर्वीच मागील दोन वर्षे बाजार महाग व्हॅल्युएशनला पोचला होता. सर्वसामान्य गुंतवणूकदार केवळ शेअरचा भाव बघतो, पण शेअर हा पत्त्याचा कॅटमधील एक पत्ता नसून, त्यामागे एक कंपनी असते. शॉर्ट टर्ममध्ये बाजारभावाला प्राधान्य असते. मात्र लाँग टर्ममध्ये कंपनीच्या परफॉर्मन्सप्रमाणेच शेअरची वाटचाल होत असल्याचे लक्षात येते. ज्या प्रमाणात कंपनीच्या मिळकतीमध्ये वाढ होत आहे, त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात कंपनीच्या शेअरच्या भावामध्ये वाढ होत असेल, तर तिथे बाजारभाववाढीचा फुगवटा निर्माण झालेला असू शकतो. १९९६ ते २००३ या कालावधीत ‘सेन्सेक्स’मधील एकूण कंपन्यांच्या प्रति शेअर मिळकतीमध्ये वार्षिक तत्त्वावर केवळ १.२१ टक्क्याने वाढ झाली होती. परिणामी, या कालावधीमध्ये ‘सेन्सेक्स’ने मोठ्या प्रमाणात वाढ दर्शविली नाही. या सात वर्षांच्या कालावधीत ‘सेन्सेक्स’ने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला. 

हेही वाचा : 'बायबॅक'चा फुगा 

या कालावधीमध्ये ‘सेन्सेक्स’ने कंपन्यांच्या मिळकतीपेक्षा जास्त वाढ दर्शविली, तेव्हा बाजारात घसरण झाली. यावरून हे लक्षात येते, की लाँग टर्मसाठी थांबले, की कायमच उत्तम परतावा मिळतो, असे नाही. ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहोत, त्या कंपनीच्या मिळकतीमध्ये वाढीचे प्रमाण काय असणार; तसेच मिळकतीमध्ये वाढ होण्यासाठी कंपनीकडे कोणते स्पर्धात्मक वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घेणे अपेक्षित आहे 

मागील १० वर्षांचा विचार करता ‘सेन्सेक्स’ किंवा ‘निफ्टी’तील कंपन्यांच्या एकूण प्रति शेअर मिळकतीत केवळ ५ ते ६ टक्के वार्षिक तत्त्वावर वाढ झाली आहे. यामुळे यापेक्षा जास्त बाजार परतावा देत असल्यास बाजाराने वेळोवेळी घसरण दर्शवली आहे. 

बाजाराचे मूल्यांकन महत्त्वाचे 
बाजाराचे किंमत-मिळकतीचे गुणोत्तर म्हणजेच पीई रेशोमुळे हा फुगवटा लक्षात येणे शक्य होते. यामुळे बाजारात लाँग टर्मची गुंतवणूक करताना केवळ निर्देशांकाचे वाढणारे आकडे पाहून गुंतवणुकीची गडबड करण्यापेक्षा बाजाराचे मूल्यांकन पाहून गुंतवणुकीचे प्रमाण ठरवणे फायदेशीर ठरते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणत्या शेअर्सकडे लक्ष द्याल? 
एकूणच विचार करता मागील लेखांमध्ये नमूद केलेल्या मॅरिको, ब्रिटानिया, गोदरेज कंझ्युमर, जुबिलंट फूडस आदी स्पर्धात्मक वैशिष्ट्ये राखून वाढ दर्शवणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक करताना एकदम गुंतवणूक न करता टप्याटप्याने गुंतवणूक करणे हितावह ठरेल. 

ट्रेडिंगचा विचार करता 'पेट्रोनेट'चा शेअर जोपर्यंत २५४ रु.च्या वर आहे, तसेच 'सिंजिन'चा शेअर ४०१ रु.च्या वर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे. पुढील आठवड्यात बाजाराने तेजी दर्शवल्यास, तसेच तेजीचा कल दर्शवणाऱ्या देखील शेअर्सने तेजी दर्शवल्यास अशा शेअर्समध्ये 'स्टॉपलॉस’चा वापर करून ट्रेडिंग करणे योग्य ठरेल. मात्र बाजाराचे व्हॅल्युएशन महाग असल्याने ट्रेंड चुकण्याचा धोका ओळखून ट्रेडिंग करताना मर्यादितच भांडवल गुंतविणे योग्य ठरेल. 

(लेखक सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole article about global economy