esakal | सरप्राईज: बाजारात "V' शेप  रिकव्हरी
sakal

बोलून बातमी शोधा

सरप्राईज: बाजारात "V' शेप  रिकव्हरी

भारतातील आघाडीची कंपनी रिलायन्समध्ये परदेशी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. अशा वेळेस शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कशा पद्धतीने गुंतवणूक करावी याचा विचार करूया.

सरप्राईज: बाजारात "V' शेप  रिकव्हरी

sakal_logo
By
भूषण गोडबोले

जागतिक शेअर बाजारापाठोपाठ भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी दर्शवत इंग्रजी अक्षर "व्ही' शेप रिकव्हरी केली आहे. लॉकडाउनच्या काळात अमेरिकेतील बेरोजगारीचे आकडे मागील 70 वर्षाच्या इतिहासातील उच्चांक मोडत 14.70  टक्केवारीला पोचला होता. मागील सप्ताहअखेर हा आकडा 13.3 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने अमेरिकी शेअर बाजारांनी धुवांधार तेजी दर्शविली आहे. अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक "डाऊ'ने एकाच दिवसात 3 टक्के 829 अंशांची तेजी दर्शविली आहे . यामुळे आगामी आठवड्यच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय बाजारातून सकारात्मक संकेत मिळताना दिसत आहेत .अमेरिकी शेअर बाजार फेब्रुवारी महिन्यातील दर्शविलेल्या  सर्वोच पातळीपासून जेमतेम  1 टक्का दूर आहे.

भारतातील आघाडीची कंपनी रिलायन्समध्ये परदेशी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. अशा वेळेस शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कशा पद्धतीने गुंतवणूक करावी याचा विचार करूया.

वॉरेन बफे म्हणतात "प्राईस इज व्हॉट यू पे व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट"  म्हणजेच किंमत जी आपण देतो आणि मूल्य जे आपल्याला त्याबदल्यात मिळते. यामुळे किती किंमत देऊन बदल्यात किती मूल्य मिळत आहे याची तुलना करून गुंतवणूक करणे हितावह ठरते. अमेरिकी शेअर बाजाराने सरप्राईज देत "व्ही' शेप रिकव्हरी केली आहे मात्र शेअर बाजाराचा "पीई रेशो' 30 वर आहे. तसेच "बफे इंडिकेटर' म्हणजेच "मार्केट कॅप टू  जीडीपी रेशो" अर्थात एकूण बाजाराचे मूल्य आणि देशातील एकूण उत्पादनाचा आकडयांचे गुणोत्तर 150 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच अमेरिकी शेअर बाजार देशातील एकूण होणाऱ्या उत्पादनाचा विचार करता खूप महाग आहे. त्याचप्रमाणे या आकडेवारीत जीडीपी हा कोरोना पूर्व काळातील विचार केला गेलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय शेअर बाजाराचा "पीई रेशो' 24 जवळ पोहचला आहे, म्हणजेच अर्निग ईल्ड किंवा परतावा 4 टक्क्यांच्या आसपास आहे आहे. यामुळे "व्ही शेप रिकव्हरी' दिसत असली तरी बाजाराचे मुल्याकंन हे पूर्वीपेक्षा स्वस्त असले तरी महागच आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मर्यादित गुंतवणूक करणेच योग्य ठरेल.

 मागील अनेक लेखामध्ये उल्लेख केलेल्या मॅरिको, गोदरेज कन्झ्युमर, ब्रिटानिया या सारख्या कंपन्यांच्या शेअरने बाजारच्या पाठोपाठ "बाउन्स बॅक' दर्शविला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्रेडिंगचा विचार करता सध्या बायोकॉन कंपनीच्या शेअरने 367 रुपये या पातळीच्या वर बंद भाव देऊन "ब्रेक आऊट' केला आहे, जोपर्यंत बायोकॉनचा शेअर 319 रुपयांच्या वर आहे, तो तेजीचा कल दर्शवत आहे. रिलायन्सचा विचार करता 1392 रुपये ही महत्त्वाची आधार पातळी आहे आगामी आठवड्यात 1617 रुपयांवर रिलायन्सने बंद भाव दिल्यास तेजीचे संकेत मिळतील. ट्रेडिंग करताना "स्टॉपलॉस'चा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ट्रेडिंग असो वा दीर्घकालीन गुंतवणूक बाजारात भांडवल मर्यादितच ठेवणे योग्य राहील.

लेखकसेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार आहेत.

loading image