esakal | तेजीचा मुहूर्त दर्शविणारे शेअर कोणते?
sakal

बोलून बातमी शोधा

तेजीचा मुहूर्त दर्शविणारे शेअर कोणते?

‘मुहूर्त ट्रेडिंग’ला एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट, एसबीआय कार्ड्‌स अँड पेमेंट्स आदी दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सनी तेजी दर्शविली.

तेजीचा मुहूर्त दर्शविणारे शेअर कोणते?

sakal_logo
By
भूषण गोडबोले

मागील आठवड्यात सप्ताहअखेरीस दिवाळीतील ‘मुहूर्त ट्रेडिंग’नंतर भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक-‘सेन्सेक्स’ ४३,६३७ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १२,७८० अंशांवर बंद झाला. शेअर बाजारात शनिवार हा सुटीचा दिवस असतो. मात्र, या शनिवारी लक्ष्मीपूजनानिमित्त विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ झाले. दिवाळीच्या मुहूर्तावर निर्देशांकांनी नवे उच्चांक गाठले. ‘मुहूर्त ट्रेडिंग’ला एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट, एसबीआय कार्ड्‌स अँड पेमेंट्स आदी दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सनी तेजी दर्शविली.

कोणत्या शेअरमध्ये तेजी?
आलेखानुसार, आगामी आठवड्यासाठी ‘सेन्सेक्स’ची ३९,२४०; तसेच ‘निफ्टी’ची ११,५३५ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. आलेखानुसार, मास्टेक, कोटक महिंद्रा बँक, ज्युबिलंट फूड वर्क्स आदी कंपन्यांचे शेअर तेजीचा कल दर्शवत आहेत. मास्टेक या कंपनीच्या शेअरचा भावदेखील जोपर्यंत रु. ८४० या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे; तसेच कोटक बँकेच्या शेअरचा भाव रु. १५३३ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आलेखानुसार तेजीचा कल दर्शवत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्युबिलंट फूड वर्क्सकडे लक्ष
ज्युबिलंट फूड वर्क्स ही कंपनी भारतात डॉमिनोज पिझ्झा, डंकिन डोनट्स या नामवंत फास्ट फूड चेन्स चालवते. ‘लॉकडाउन’च्या काळात फास्ट फूड व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणे अपेक्षित होते. पण ‘लॉकडाउन’नंतरच्या काळात फास्ट फूड व्यवसाय हळूहळू पुन्हा गती पकडणे अपेक्षित आहे. आलेखानुसार, या कंपनीच्या शेअरने ‘ब्रेकआऊट’ म्हणजेच तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी आठवड्यात निर्देशांकाने; तसेच ज्युबिलंट फूड वर्क्स या शेअरने तेजीचा कल दर्शविल्यास रु. २१०० या पातळीचा ‘स्टॉपलॉस’ ठेऊन मध्यम अवधीसाठी हा शेअर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(डिस्क्लेमर ः लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. वरील लेखातील माहिती त्यांनी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली आहे. प्रत्यक्ष शेअरच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जोखीम ओळखून आपापल्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे हिताचे ठरते.)

loading image