esakal | शेअर मार्केट : महाग शेअर बाजार आणि स्वस्त सोने
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५०,७९२ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,०३० अंशांवर बंद झाला. शुक्रवारी ‘सेन्सेक्स’मध्ये ४८७ अंशांची, तर ‘निफ्टी’मध्ये १४३ अंशांची घसरण झाली. कच्चा तेलाचे भाव वाढले आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एकीकडे औद्योगिक उत्पादन दरात घसरण झाली आहे, तर दुसरीकडे महागाई दराने उडी मारली आहे.

शेअर मार्केट : महाग शेअर बाजार आणि स्वस्त सोने

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५०,७९२ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,०३० अंशांवर बंद झाला. शुक्रवारी ‘सेन्सेक्स’मध्ये ४८७ अंशांची, तर ‘निफ्टी’मध्ये १४३ अंशांची घसरण झाली. कच्चा तेलाचे भाव वाढले आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एकीकडे औद्योगिक उत्पादन दरात घसरण झाली आहे, तर दुसरीकडे महागाई दराने उडी मारली आहे. शेअर बाजाराचा विचार करता आलेखानुसार, आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४८,८९०, तर ‘निफ्टी’ची १४,४६७ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. बाजारात पडझड होत असतानादेखील गेल्या आठवड्यात डेल्टा कॉर्पोरेशन, इंडियन एनर्जी एक्स्चेंज, टाटा केमिकल्स आदी कंपन्यांच्या शेअरने तेजीचे संकेत देत, चांगली भाववाढ दर्शविली आहे.

गेमिंग कंपन्यांकडे लक्ष
आगामी काळात ‘नझारा टेक्नॉलॉजीज’ या ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचे शेअर ‘आयपीओ’मार्फत विक्रीसाठी  उपलब्ध होणार आहेत. विविध ऑनलाइन क्रिकेट स्पर्धा, कॅरम कॅश; तसेच छोटा भीम रेस, मोटू पतलू जंप आदी अनेक ऑनलाइन गेम खेळण्याची सुविधा ही कंपनी देते. ऑनलाइन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे, यामुळे (तसेच राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे शेअर असल्याने) या कंपनीच्या ‘आयपीओ’कडे ‘ट्रेडर्स’चे लक्ष असणे स्वाभाविक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘डेल्टा’मध्ये तेजीचे संकेत
‘डेल्टा कॉर्पोरेशन’ ही देखील भारतातील एक मोठी गेमिंग कंपनी आहे. कॅसिनो गेममधील ही एक नोंदणीकृत कंपनी आहे. व्यवस्थापित कॅसिनो मार्केटमध्ये या कंपनीचा सर्वांत मोठा हिस्सा आहे. या कंपनीच्या शेअरने डिसेंबर २०२० पासून, रु. १३८ ते १७४ या मर्यादित पातळ्यांमध्ये चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात उलाढालीमध्ये सरासरीपेक्षा जास्त वाढ दर्शविली. रु. १७४ या अडथळा पातळीच्या वर रु. १८८ बंद भाव देऊन आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. १३८ या पातळीच्या वर आहे, तोपर्यँत मध्यम अवधीमध्ये आणखी भाववाढ होऊ शकेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज’मध्ये तेजी
‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज’ (आयईएक्स) हा देशातील प्रथम आणि सर्वांत मोठा एनर्जी एक्स्चेंज आहे. केंद्रीय वीज नियामक आयोगाद्वारे वीज वितरण, नूतनीकरणयोग्य ऊर्जा प्रमाणपत्रे आणि ऊर्जा बचत प्रमाणपत्रे यासाठी देशव्यापी, स्वयंचलित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ही कंपनी प्रदान करते. कंपनी उत्तम परतावा मिळवत आहे. गेल्या महिन्यापासून रु. २७६ ते ३२३ या मर्यादित पट्ट्यात चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात या कंपनीच्या शेअरने रु. ३२३ या पातळीच्या वर रु. ३२८ ला बंद भाव देत तेजीचा कल दर्शविला आहे. मात्र, एकंदरीत शेअर बाजारात मिळकतीच्या तुलनेत बाजारभाव महाग असल्याने सावध पवित्र घेत मर्यादितच गुंतवणुकीचा विचार करणे हितावह ठरू शकेल. 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top