शेअर बाजारात कशी कराल बॅटिंग? 

शेअर बाजारात कशी कराल बॅटिंग? 

मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने व्याजदराबाबत कोणताही फेरबदल न करता ‘जैसे थे’ धोरण स्वीकारले. मात्र, अर्थव्यवस्थेबाबत आशावादी वक्तव्य केल्याने आठवडाअखेरीस ‘सेन्सेक्स’ ३२६ अंशाची तेजी दर्शवीत ४०,५०९ अंशांवर, तर ‘निफ्टी’ ७९ अंकांची तेजी दर्शवीत ११,९१४ अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आपली अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. औषधे, ग्राहकोपयोगी वस्तू, शेती, ऊर्जानिर्मिती आदी साथीच्या संक्रमणकाळातही तग धरून राहिलेली क्षेत्रे सर्वप्रथम खाते उघडून फलंदाजी केल्याप्रमाणे धावफलक हलता ठेवतील. ज्या क्षेत्रांची लॉकडाउनमुळे लय हरविली होती, ती लवकर सावरू शकणारी क्षेत्रे दुसऱ्या टप्प्यात फलंदाजी केल्याप्रमाणे फलंदाजी करतील. कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेली क्षेत्रे कालांतराने सावरत अंतिम षटकांमध्ये फटकेबाजी करत धावगती वाढवतील. 

आघाडीचे फलंदाज कोण? 
लाँग टर्मसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करता, औषध किंवा फार्मा क्षेत्रातील कंपन्यांची निवड करण्याचे ठरविल्यास पॅथॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या थायरोकेयर टेक्नोलॉजी लि. (सध्याचा भाव ः रु. १०६८), डॉक्टर लाल पॅथ लॅब (सध्याचा भाव ः रु. २०५४) या कंपन्यांच्या शेअरमध्ये; तसेच औषध क्षेत्रातील अबॉट इंडिया (सध्याचा भाव ः रु. १६,०३६), डिव्हीज लॅब (सध्याचा भाव ः रु. ३१९०) आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. साथीच्या संक्रमण काळातही तग धरून राहिलेल्या ग्राहकोपयोगी खाद्य क्षेत्रातील ब्रिटानिया इंडस्ट्रीज (सध्याचा भाव ः रु. ३७४५ रु) या सारख्या कंपनीच्या शेअरचा देखील लॉँग टर्मसाठी विचार करणे योग्य ठरेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मधल्या फळीतील फलंदाज
मधल्या टप्यातील फलंदाजीचा विचार करता, लॉकडाउन संपल्यामुळे ग्राहकोपयोगी त्याचप्रमाणे लवकर सावरू शकणाऱ्या पादत्राणांच्या विक्री क्षेत्रातील रिलॅक्सो फूटवेअर लि. (सध्याचा भाव ः रु. ६४९); तसेच बाटा इंडिया (सध्याचा भाव ः रु. १३५२) या कंपनीच्या शेअरची निवड करणे योग्य ठरू शकेल. 

शेवटच्या टप्प्यात ट्रॅव्हल-टुरिझम 
कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेल्या मात्र कालांतराने सावरू शकणाऱ्या ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्राचा अंतिम टप्प्यातील फलंदाजीसाठी विचार करता येऊ शकेल. पूर्वी सूचित केल्याप्रमाणे, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कंपनीच्या शेअरमध्ये (सध्याचा भाव ः रु. १३५१), तसेच लगेज बॅग्जमधील व्हीआयपी इंडस्ट्रीज लि. या कंपनीच्या शेअरमध्ये (सध्याचा भाव ः रु. २९६) लाँग टर्मसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. 

अशाप्रकारे काहीशी जोखीम स्वीकारून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचे धोरण अवलंबिल्यास भविष्यात उत्तम परतावा मिळण्याची शक्यता निर्माण होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘स्टॉपलॉस’ ठेवूनच खेळा! 
मध्यम अवधीसाठी ट्रेडिंगचा विचार केल्यास, टेक महिंद्रा लि. या कंपनीच्या शेअरने ८४५ रुपये या पातळीच्या वर ८५४ रुपयांना बंद भाव देऊन आलेखानुसार मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. आगामी आठवड्यात ‘निफ्टी’ने; तसेच ‘टेक महिंद्रा’ या शेअरनेदेखील तेजी दर्शविल्यास रु. ७२१ या पातळीचा ‘स्टॉपलॉस’ ठेवून मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारून मध्यम अवधीसाठी ट्रेडिंग करणे फायदेशीर ठरू शकेल. 

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करताना जोखीम ओळखून जाणकार सल्लागारांचा सल्ला घेणे हितकारक ठरेल.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com