Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे बदल, जाणून घ्या आजचे दर

gold.png
gold.png

नवी दिल्ली- सराफ बाजारात आज  (दि.21) चांदीची चमक वाढली आहे. देशभरात सराफ बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव बुधवारच्या तुलनेत 452 रुपये प्रती 10 ग्रॅम महाग होऊन तो 49714 वर उघडला. तर चांदी 1354 रुपये प्रति किलो उसळून 67342 रुपयांवर सुरु झाला. तर 22 कॅरेट सोने 45538 रुपये 23 कॅरेट सोने 49515 रुपये आणि 18 कॅरेट सोने 37286 रुपये प्रती 10 ग्रॅम दरावर सुरु झाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारा जारी करण्यात आलेले दर आणि आपल्या शहरातील दरांमध्ये 500 ते 1000 रुपयांचा फरक असू शकतो. 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटनुसार 21 जानेवारी 2021 ला देशभरातील सराफ बाजारातील सोन्या-चांदीचे हजर भाव पुढीलप्रमाणे...

21 जानेवारीचा दर (10 ग्राम)     20 जानेवारीचा दर (10 ग्राम)  दरातील बदल
Gold 999 (24 कॅरेट)     49714                   49262                      452
Gold 995 (23 कॅरेट)     49515                   49065                     450
Gold 916 (22 कॅरेट)     45538                  45124                      414
Gold 750 (18 कॅरेट)     37286                  36947                      339
Gold 585 ( 14 कॅरेट) 29083                  28818                         265
Silver 999       67342 Rs/Kg             65988 Rs/Kg                 1354 Rs/Kg

आयबीजेएकडून जारी करण्यात आलेले दर देशभरात सर्वमान्य आहेत. या वेबसाइटवर देण्यात आलेल्या दरात जीएसटीचा समावेश नाही. सोने खरेदी करताना किंवा विकताना तुम्ही आयबीजेएच्या दराचा हवाला देऊ शकता. आयबीजेएच्या मते, आयबीजेएचे देशभरात 14 केंद्रातून सोन्या-चांदींचे चालू दर घेऊन त्याची सरासरी किंमत सांगितली जाते. सोन्या-चांदीचा चालू दर किंवा हजर भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. परंतु, त्याच्या किंमतीत थोडे अंतर असू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com