1 फेब्रुवारीपासून होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

Big changes from 1st February in Banking and other Sector It will have a direct effect on your pocket
Big changes from 1st February in Banking and other Sector It will have a direct effect on your pocket
Summary

Changes From 1st February: फेब्रुवारीपासून बँकिंग क्षेत्रापासून इतर क्षेत्रांसाठी काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक विविध सेवांशी संबंधित काही नवीन नियम लागू करणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

Changes From 1st February: : नवीन वर्ष 2022(New Year 2022) चा पहिला महिना म्हणजे जानेवारी (janurary) संपणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे फेब्रुवारीपासून अनेक बदल होणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करतील. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल होणार हे उघड आहे. बजेट (Aam budget 2022) व्यतिरिक्त, 1 फेब्रुवारीपासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावरही परिणाम होईल. (Big changes from 1st February in Banking and other Sector)

SBI करणार मोठे बदल!

देशातील पहिली सार्वजनिक बँक SBI पैसे ट्रान्सफर (transferring money) करण्याचे नियम बदलत आहे. आता IMPS द्वारे २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक 20 रु. + अधिक GST शुल्क आकारणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करणे महागात पडणार आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2021 मध्ये, RBI ने IMPSद्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPSद्वारे व्यवहारांची मर्यादा एका दिवसात 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे.

Big changes from 1st February in Banking and other Sector It will have a direct effect on your pocket
Budget 2022: यंदा बजेटमध्ये सर्वसामान्यांना 3 गिफ्ट्स मिळण्याचा अंदाज!

बँक ऑफ बडोदातचेही नियम बदलले

१ फेब्रुवारीपासून होणाऱ्या बदलांमध्ये बँक ऑफ बडोदाच्या चेक क्लिअरन्सच्या नियमाचांही समावेश करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना १ फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिमचे (positive pay system) पालन करावे लागेल. म्हणजेच आता चेक संबंधित माहिती द्यावी लागेल तरच, तुमचा चेक क्लिअर होईल. हे बदल 10 लाख रुपयांपेक्षा जास्त चेक क्लिअरन्ससाठी आहेत.

पीएनबीने लागू केले कडक नियम

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) बदलत्या नियमांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. आता तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 10 रुपये होता. म्हणजेच आता तुम्हाला यासाठी १५० रुपये जास्त रक्कम मोजावी लागेल. .

Big changes from 1st February in Banking and other Sector It will have a direct effect on your pocket
SBI चा नियम 1 तारखेपासून बदलणार! ग्राहकांना होणार मोठा फायदा

गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल

एलपीजीची किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केली जाते. यावेळचे बजेटही समोर आहे, त्यामुळे 1 फेब्रुवारीला सिलिंडरच्या दरांवर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. दर वाढले किंवा कमी झाले तर त्याचा परिणाम जनतेच्या खिशावर नक्कीच होणार आहे.

नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर (वैयक्तिक आयकर दर) संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतात. कोरोनाच्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडत असताना हा सर्वसाधारण अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. 5 राज्यांच्या निवडणुकाही समोर आहेत, त्यामुळे या अर्थसंकल्पात सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com