दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनविणार बिंदू कॅप

Bindu -the Smart cap
Bindu -the Smart capSakal

दृष्टीदोष (व्हिज्युअल इम्पेरमेंट) हा आरोग्याशी जेवढा संबंधित आहे तेवढाच सामाजिक-आर्थिक प्रश्नांशी जोडलेला विषय आहे. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना शाळा वा महाविद्यालयीन जीवनात किंवा नंतरही पुरेशी संसाधने न मिळाल्याने अनेक संधी गमवाव्या लागतात. त्यामुळे साहजिकच दृष्टीदोष असलेल्यांना रोजगार किंवा नोकरी मिळण्यातही अडचणी येतात. त्यांच्याकडे असलेले कौशल्य कंपन्यांना वापरता येऊ शकते. शिवाय, देशातील सुमारे सव्वाकोटी दृष्टीहिन रोजगारक्षम व्यक्ती या मुख्य प्रवाहात येऊ शकतात. ऑप्टिमम डेटा अ‍ॅनॅलिटिक्स (Optimum Data Analytics) कंपनीच्या संस्थापक ऋतुजा उद्यावर (Rutuja Udyawar) यांनी हे जाणले आणि 'बिंदू - दी स्मार्ट कॅप' हा प्रकल्प हाती घेतला. (Bindu-the smart cap project started by Optimum Data Analytics startup)

मुंबई विद्यापीठातून बीएससी व एमएससी स्टॅटिस्टिक्स (MSc Statistics) या क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऋतुजा यांनी डेटा सायन्स (Data Science) या क्षेत्रात आपले करिअर केले. टाटा मोटर्सच्या 'क्वाॅलिटी सिस्टिम्स अँड रिलायबिलिटी' या विभागात त्यांनी काम केले व नंतर एमएस अप्लाईड स्टॅटिस्टिक्स (MS in Applied Statistics) या विषयातील उच्चशिक्षण घेण्यासाठी त्या अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत गेल्या. त्यानंतर अनेक स्टार्टअप्स व बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी त्यांनी काम केले. हे काम करत असताना त्यांनी आरोग्य, विमा, विधी, उत्पादन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) अशा विविध क्षेत्रांमध्ये मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा उपयोग केला.

Bindu -the Smart cap
Credit Card सांभाळून करा क्रेडिट कार्डचा वापर, नाहीतर होतील वांदे

ऋतुजा यांच्यासोबत निखिल बुटाला, अजय काशिकर आणि मंजिरी गोखले-जोशी हे तिघेही बिंदू कॅप उपक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्या कंपनीविषयी माहिती देताना ऋतुजा म्हणाल्या, “डेटा सायन्स या विषयात मी गेली १५ वर्ष काम करत आहे. या अनुभवाच्या जोरावर, मी मी फेब्रुवारी २०१७ मध्ये मशीन लर्निंग (एमएल) आणि आर्टिफिशियल इंटलिजन्स (एआय) संबंधित सेवा पुरविणारी कंपनी स्थापन केली. सुरवातीच्या टप्प्यात आम्ही काही प्रकल्प हाती घेतले होते. २०१९ च्या अखेरिस एका प्रकल्पावर काम करत असताना आमच्याकडील एक प्रशिक्षणार्थीने त्याचा अनुभव आम्हाला सांगितला. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना परीक्षेत तो मदत करीत असत. या संपूर्ण प्रक्रियेत दृष्टीहीन किंवा अंध व्यक्तींप्रमाणेच अल्पदृष्टी वा अन्य स्वरुपाचे दृष्टीदोष असलेल्यांनाही खूप अडचणींना सामोरे जावे लागते हे त्याच्यामुळे समजले. या अडचणींवर मात करण्यासाठी काहीतरी करण्याचा आम्ही निश्चय केला आणि त्यातून बिंदू - स्मार्ट कॅप उपक्रमाचा जन्म झाला."

“संभाव्य वापरकर्त्यांच्या नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही नेत्रतज्ज्ञांशी, अंधांसाठीच्या वसतीगृह, संस्थांमधील लोकांशी संवाद साधला. त्यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे संपूर्ण किंवा अंशतः अंध असलेल्या व्यक्ती या ब्रेल लिपीवर अवलंबून असतात किंवा ध्वनी-सूचनांवर. जन्मतः अंध किंवा दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना ब्रेल लिपी समजते मात्र वयोमानानुसार किंवा कोणत्या आजाराने संपूर्ण किंवा अंशतः अंधत्व आलेल्यांना ब्रेल लिपीची सवय नसते. अशा व्यक्तींना नोकरी टिकविण्यासाठी किंवा नवी मिळविण्यातही अडचणी येतात. अ‍ॅसिस्टेड रिडिंग (Assisted Reading) म्हणजे वाचण्यासाठी मदत करणारी काही उपकरणे व तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र ते बहुतांश पाश्चिमात्य देशांत व तेथील लोकांच्या सोयीच्या दृष्टीने बनविलेले आहे. त्यामुळे भारतातील दृष्टीहीन लोकांना त्याचा फारसा फायदा होत नाही. शिवाय, महाग असल्या कारणानेही अशा उपकरणांचा वापर आपल्याकडे कमी आहे," असे ऋतुजा यांनी सांगितले.

Bindu -the Smart cap
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पक्का खबरी आहे PAN CARD, नंबर्स करतात सर्व पोलखोल

“बिंदू - स्मार्ट कॅप ही कॅमेरा आणि मायक्रोफोन बसविण्यात आलेली विशेष प्रकारची कॅप आहे. ही कॅप घालणारी व्यक्ती कॅमेऱ्याच्या सहाय्याने संवाद साधू शकते आणि पाहिजे ती माहिती मिळवू शकते. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी लिहिलेल्या मजकुराची प्रतिमा कॅमेऱ्याद्वारे टिपली जाते आणि त्यातील मजकूर वाचून (ध्वनी-रुपांतरित) केला जातो. तसेच समोर कोणती वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे याची माहितीदेखील कॅप घालणाऱ्यांना ध्वनी-स्वरुपात पोचविली जाते. सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर इंग्रजीमध्ये राबविली जात असून त्यामध्ये आम्हाला ९० टक्के अचूकता मिळत आहे. भविष्यात ही सेवा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच बिंदू स्मार्ट कॅपची किंमत आठ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे ऋतुजा यांनी सांगितले.

"बिंदू स्मार्ट कॅपचा प्रायोगिक तत्त्वावरील वापर हा सध्या माया केअर फाउंडेशनच्या (Maya CARE foundation) मदतीने सुरू आहे. पुढील दोन महिने या चाचण्या सुरू राहणार असून त्याद्वारे अधिकाधिक डेटा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशाच पद्धतीने मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि डिसेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण देशात विविध भागात, भाषांमध्ये या चाचण्या करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी आम्ही आतापर्यंत दहा लाख रुपये खर्च केला आहे. मात्र नजिकच्या भविष्यात आम्ही गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील आहोत. सुमारे एक कोटी रुपयांचे फंडिंग आम्हाला अपेक्षित आहे. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी असलेल्या उत्पादने व सेवा यांची ५०० कोटी रुपयांची जागतिक बाजारपेठ आहे," असेही ऋतुजा यांनी सांगितले.

Bindu -the Smart cap
हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल, तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com