esakal | एलॉन मस्क यांच्या एका ट्विटने बिटकॉईन क्रॅश; किंमत घसरली
sakal

बोलून बातमी शोधा

bitcoin

बिटकॉईनची किमंत गेल्या काही महिन्यांपासून घसरत आहे. त्याला चीनचा पवित्रा व प्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क यांचे ट्विटही कारणीभूत आहे.

एलॉन मस्क यांच्या एका ट्विटने बिटकॉईन क्रॅश; किंमत घसरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीजिंग - सध्याच्या क्रिप्टो करन्सीमधील (Cryptocurrency) सर्वात लोकप्रिय डिजिटल चलन असलेल्या बिटकॉईनची (Bitcoin) किमंत गेल्या काही महिन्यांपासून घसरत आहे. त्याला चीनचा पवित्रा व प्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क (Elon Musk) यांचे ट्विटही कारणीभूत आहे. ‘कॉईनबेस’ या अमेरिकी कंपनीच्या आकडेवारीनुसार बुधवारी सकाळी साडेअकराला बिटकॉईनची ३८,५७० डॉलर इतकी नोंदविली गेली. गेल्या महिन्यात ६४ हजार डॉलरचा उच्चांक गाठल्यानंतर फेब्रुवारीपासूनचा हा नीचांक आहे. मस्क यांची डिजिटल चलनाबद्दलचा धरसोडीची वृत्ती आणि चीनने क्रिप्टो व्यवहारांवर घातलेली बंदीही बिटकॉईनच्या घसरणुकीला कारणीभूत ठरली. (bitcoin-cryptocurrency-price-fall-after-elon-musk-tweet)

चीनने या व्यवहारांवर निर्बंध आणण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांवर बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे, गुंतवणूकदारांना क्रिप्टो व्यवहारांबाबतही इशारा दिला आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी बिटकॉईन व्यवहारात ‘विकत घ्या आणि बुडवा’ ही वृत्ती वाढत असल्याचे चिन्ह आहे. यावेळी गुंतवणूकदार अधिक निराश वाटत असल्याचे ट्विट केले. त्यामुळेही बिटकॉईनच्या किंमतीत मोठी घसरण झाली. डिजिटल गुंतवणूदारांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. मस्क यांनी बिटकॉईन पर्यावरणपूरक नसल्याचे म्हटल्यावर गुंतवणूकदारांनी कार्बन उत्सर्जनामुळे बिटकॉईनचा आढावा घेतला.

हेही वाचा: कोविडकाळातही ‘त्यांच्या’ श्रीमंतीत भरच!

गेल्या काही महिन्यांपासून ऊर्जा वापराचा वाढलेला कल वेडेपणा आहे, असे ट्विट करत त्यांनी केंब्रिज बिटकॉईन विद्युत वापराचा तक्काही मस्क यांनी शेअर केला होता. बिटकॉमनळे ऊर्जा वापर वाढत आहे. त्यामुळे, इलेक्ट्रिक मोटारीसाठी क्रिप्टो चलन स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्याचा टेस्लाला फटका बसून मस्क दुसऱ्या क्रमांकावरील जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचे स्थानही गमावून बसले.

चीनच्या उद्योग कंपन्यांचे निवेदन
चीनमधील तीन प्रमुख उद्योग कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सीमुळे लोकांच्या संपत्तीची सुरक्षिततेला धोका आहे. त्याचप्रमाणे, सामान्य अर्थव्यवस्था विस्कळित होणार असल्याचेही एका संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे. चीनने क्रिप्टो व्यवहारांवर बंदी घालून परकीय चलन संकेतस्थळेही बंद केली आहेत.

loading image
go to top