आयएल अँड एफएसच्या व्यवस्थापनावर ठपका

पीटीआय
बुधवार, 5 जून 2019

आयएल अँड एफएस समूहातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर गुन्हे तपास विभागाने (एसएफआयओ) कंपनीतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. यात स्वतंत्र संचालकांसह कंपनीच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नुकतेच गंभीर गुन्हे तपास विभागाकडून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींकडून वसुली करण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - आयएल अँड एफएस समूहातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर गुन्हे तपास विभागाने (एसएफआयओ) कंपनीतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. यात स्वतंत्र संचालकांसह कंपनीच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नुकतेच गंभीर गुन्हे तपास विभागाकडून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींकडून वसुली करण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.

आयएल अँड एफएस समूहाला आर्थिक संकटात टाकून आरोपींनी वैयक्तिक लाभ उठवल्याचे चौकशीत समोर आले आहे. आयएल अँड एफएस समूहावर ९० हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, म्युच्युअल फंडांसह अनेक संस्थात्मक गुंतवणूकदारांची देणी कंपनीने थकवली आहेत. हा गैरव्यवहार करणाऱ्यांचा छडा लावण्यात ‘एसएफआयओ’ला यश आले आहे. यात समूहाच्या व्यवस्थापनातील रवी पार्थसारथी, हरी शंकरन, अरुण साहा, रमेश बावा, वैभव कपूर आणि के. रामचंद या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blame management of IL & FS