Bonds VS FD Return | असा मिळवा एफडीपेक्षा जास्त परतावा सरकारी हमीसह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bonds VS FD Returns

Bonds VS FD Return : असा मिळवा एफडीपेक्षा जास्त परतावा सरकारी हमीसह

मुंबई : जेव्हा पैसे गुंतवायचे असतात तेव्हा बहुतेक ज्येष्ठ नागरिक FDsकडे वळतात. सातत्यपूर्ण व्याज उत्पन्न मिळविण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक FD ऐवजी बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात, ज्यामुळे त्यांना अधिक नफा मिळेल.

बँका एफडीचे दर वाढवl नाहीत. दुसरीकडे, बाँडवरील परतावा बाजारावर आधारित असतो, त्यामुळे चांगला परतावा मिळतो. उदाहरणार्थ, ७ वर्षांच्या करमुक्त रोख्यांनी ८ टक्के परतावा दिला आहे, तर मोठ्या बँकांमध्ये हा परतावा ६.५ टक्क्यांपर्यंत आहे. (Bonds VS FD Returns)

हेही वाचा: व्हायचं असेल कोट्यधीश तर स्वत:ला या सवयी लावून घ्या...

महागाईवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अलीकडेच व्याजदरात वाढ केली आहे. यानंतर सर्व बँकांनी त्यांचे कर्जदर वाढवले ​​आहेत, परंतु एफडी दरांच्या बाबतीत असे काहीही होताना दिसत नाही.

अशा परिस्थितीत, कॉर्पोरेट बाँड्स आणि सरकारी सिक्युरिटीज हे एफडीच्या तुलनेत चांगले परताव्याचे पर्याय आहेत आणि सुरक्षित देखील आहेत. पैशांच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी देणारे सरकारी रोखे देखील चांगले परतावा देत आहेत.

हेही वाचा: SBI देत आहे घरबसल्या दरमहा ८० हजार रुपये कमवण्याची संधी

ज्येष्ठ नागरिकांना उच्च स्तरावरील सुरक्षिततेची आणि चांगल्या परताव्याची गरज असते, जी सरकारी रोख्यांमधून मिळू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्मद्वारे सरकारी रोखे बाजारात अधिकाधिक गुंतवणूकदार आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घेण्यासाठी हमी म्हणूनही सरकारी रोखे सहज वापरता येतात.

एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा २०५१ आणि २०६१ मध्ये मुदत संपणारे सरकारी रोखे ७.५५ टक्के दराने उपलब्ध आहेत. म्हणजेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना २९ वर्षे आणि ३९ वर्षांसाठी ७.५५ टक्के व्याज मिळेल. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी कोणतीही बँक एफडी देत ​​नाही. याशिवाय, काही कॉर्पोरेट बाँड्स ९.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत, परंतु त्यांचा कालावधी खूपच कमी आहे.

Web Title: Bonds Vs Fd Return Get Higher Return Than Fd With Government Guarantee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bank FD