
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लवकरच वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) सुधारित आवृत्ती (व्हर्जन) येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा संसदेत केली.
अर्थसंकल्प :
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लवकरच वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) सुधारित आवृत्ती (व्हर्जन) येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा संसदेत केली. जीएसटी हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल आहे. जीएसटी गेल्या दोन वर्ष आव्हानांचा सामना करत आहे. मात्र जीएसटी परिषदेने चांगले काम केले असून आतापर्यंत ६० लाख नवीन करदात्यांची भर घातली आहे. तसेच, ४० कोटी व्यक्ती जीएसटी परतावा भरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जीएसटीमधील कपातीचा ग्राहकांना फायदा झाला असून ग्राहकांची सुमारे १ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आता नवीन प्रणाली अधिक सुधारित आणि सुटसुटीत असेल असेही सीतारामन यांनी सांगितले. जीएसटीमुळे ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला असून इन्स्पेक्टर राजही संपुष्टात आले असल्याचे त्या बोलल्या.
Budget 2020 : केंद्रिय अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे
जेटलींची आठवण
अर्थसंकल्प मांडत असताना जीएसटीची माहिती देताना सीतारामन यांनी दिवंगत भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची आठवण काढली. जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत असे सांगत निर्मला सीतारामन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.