Budget 2020 : नेहरूंनी आणला देशात गिफ्ट टॅक्स!

pandit nehru
pandit nehru

अर्थसंकल्प सादर करत असताना त्यात नव्या कर व्यवस्था त्या-त्या वेळच्या अर्थमंत्र्यांनी निर्माण केल्या. तसेच काही शब्ददेखील परवलीचे केले गेले. आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा, डिजिटल अशा अनेक शब्द अर्थसंकल्पात विराजमान होत देशाच्या बदलत्या आर्थिक धोरणाची, त्याच्या बदलती कूस सांगणारे होते... 

देशाच्या जडणघडणीत पंडीत जवाहरलाल नेहरूंच योगदान अतुलनीय आहे. अलिप्तराष्ट्रवादाची चळवळ असेल किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेतील निर्णय. नेहरूंनी कायम हे निर्णय घेताना धाडस दाखवलं. देशात गिफ्ट टॅक्स नेहरूंनी आणला. तर, भाजपच्या काळात जीएसटी सुरू झाला असला तरी, देशाला जीएसटीची खरी ओळख पी. चिदंबरम यांनी करून दिली.

नेहरूंनी आणला गिफ्ट टॅक्स  
- करचुकवेगिरीला आळा घालता यावा, या हेतूने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1958-59 च्या अर्थसंकल्पात गिफ्ट टॅक्सं पहिल्यांदा आणला. त्या-त्या आर्थिक वर्षांत जी व्यक्ती गिफ्ट (बक्षीस) देईल, त्याला कर देणे यामुळे बंधनकारक झाले. 

2006 पासून जीएसटी चर्चेत 
- संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिकात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी संपूर्ण देशासाठी एकच कररचना असलेल्या गुडस्‌ अँड सर्व्हिसेस टॅक्सषचा (जीएसटी) नामोल्लेख 28 फेब्रुवारी 2006 रोजीच्या आपल्या भाषणात केला होता. पुढे तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कार्यवाहीत आणून दाखवला. 

इन्फ्रास्ट्रक्चेर, डिजिटल 
- अर्थसंकल्पाच्या पहिल्या तीस वर्षांत इन्फ्रास्ट्रक्च र हा शब्द कधीच वापरला गेला नव्हता. 1990 पर्यंत पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चिर) हा शब्द कधीच वापरला नाही. त्यानंतरच्या अर्थसंकल्पात मात्र "इन्फ्रास्ट्रक्चसर' हा परवलीचा शब्द बनला. आता तर आपल्या जीवनाचा तो अविभाज्य भागच बनलाय. 

- "डिजिटल' हा शब्द पहिल्यांदा 1982-83 च्या अर्थसंकल्पात वापरला गेला, तोही केवळ एकदाच. त्यानंतर, 2016-17 च्या अर्थसंकल्पात हाच शब्द सातवेळा वापरला गेला. 

जाहीर करा काळा पैसा 
- काळा पैसा जाहीर करण्यासाठीची पहिली योजना 1965-66 च्या अर्थसंकल्पात होती. 

अडीच तास सादरीकरण 
- अरुण जेटली यांनी 2014 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण तब्बल अडीच तास सुरू होते, त्यामध्ये पाच मिनिटांची सुटी घेतली गेली होती. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com