
Budget 2022: किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढू शकते, शेतकर्यांना स्वस्त कर्जासह बरेच फायदे
Kisan Credit Card Scheme: किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जावर 7 टक्के दराने व्याज आकारले जाते. पण, शेतकऱ्याने वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास त्याला केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल. किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आणि शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज घेण्यासाठी एक उत्तम योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. बजेट 2022 मध्ये, सरकार KCC कर्जाची मर्यादा आणखी वाढवू शकते अशी अपेक्षा आहे. (Kisan Card Updates in Budget 2022)
हेही वाचा: Mutual Fund: टॅक्स सेव्हिंगसह बंपर रिटर्न स्कीम; फक्त 5 वर्षात एक लाखाचे 3 लाख
किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढणार ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, मोदी सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकते. (Union Budget 2022 Live Updates)
किसान क्रेडिट कार्ड व्याजदर किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जावर 7 टक्के दराने व्याज मिळते. पण शेतकऱ्याने वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास त्याला केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.
पीक विमाही (Crop Insurance) किसान क्रेडिट कार्डमुळे, शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा देखील काढू शकतात, ज्यामुळे जेव्हा कधी पिकाचे नुकसान होते तेव्हा त्याची भरपाई देखील मिळेल. पूर आल्यास, पाण्यात बुडून पिकाचे नुकसान झाल्यास किंवा दुष्काळ पडल्यास, पीक जळून गेल्यास किसान क्रेडिट कार्ड अत्यंत उपयुक्त आहे.
हेही वाचा: RBL बँकेच्या शेअर्सवर मिळेल तगडा परतावा, ब्रोकरेज हाऊसेसकडून 'Buy' रेटींग
किसान क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये (KCC कर्ज योजना) -
KCC खात्यातील कर्जावर बचत बँकेच्या दराने व्याज दिले जाते.
KCC कार्डधारकांसाठी मोफत एटीएम कम डेबिट कार्ड दिले जाते.
स्टेट बँक ऑफ इंडिया, शेतकऱ्यांना स्टेट बँक किसान कार्डच्या नावाने डेबिट/एटीएम कार्ड देते.
KCC मध्ये, 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वार्षिक 2% दराने व्याज सवलत उपलब्ध आहे.
वेळेआधी कर्जाच्या परतफेडीवर वार्षिक 3% दराने अतिरिक्त व्याज सवलत आहे.
KCC कर्जावर पीक विमा संरक्षण उपलब्ध आहे.
पहिल्या वर्षासाठी कर्जाची रक्कम शेतीची किंमत, काढणीनंतरचा खर्च आणि जमिनीची किंमत या आधारे ठरवली जाते.
हेही वाचा: घसरणीनंतर गुरूवारी शेअर बाजारात रिकव्हरी, आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
KCC योजनेसाठीच्या अटी
- 1.60 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही सुरक्षिततेची आवश्यकता नाही.
- एका वर्षासाठी किंवा कर्जाच्या परतफेडीच्या तारखेपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्यावर 7% दराने व्याज आकारले जाईल.
- वेळेत कर्जाची परतफेड न केल्यास, कार्डवरील दराने व्याज द्यावे लागेल.
- कर्जाची मुदत उलटल्यानंतर सहामाहीपासून चक्रवाढ व्याज आकारले जाईल. क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
- देशातील सर्व शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- देशातील एकूण 14 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून फायदा मिळणार आहे.
- केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्डद्वारे 1.60 लाख रुपयांचे कर्ज देते.
Web Title: Budget 2022 Kisan Credit Card Limit May Increase Cheap Loans And Other Benefits For Farmers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..