esakal | बजेटनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या

बोलून बातमी शोधा

gas_20cylinder}

आज सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेला झटका दिला आहे.

बजेटनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- आज सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेला झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीसोबत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीची समीक्षा करतात. प्रत्येक राज्यात टॅक्स वेगवेगळे असते आणि यानुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये फरक पडतो. आजपासून तुम्हाला १४.२ किलोच्या बिगर-सबसिडी एलपीजी गॅस सिलिंडरसाठी जास्त किंमत द्यावी लागणार आहे. दुसरीकडे १९ किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. 

किती महाग झाले गॅस सिलिंडर

इंडियन ऑईल कॉरपोरेशन लिमिटेडच्या (आयओसीएल) वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४.२ किलोग्रॅमच्या बिगर-सबसिडी एलपीजी गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग झाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये गॅसची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये याची किंमत ७२० रुपये होती, तेथे आता ७४५.५० रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये ७१० रुपयांच्या गॅस सिलिंडरची किंमत ७३५ रुपये झाली आहे. याआधी १५ डिसेंबरला गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांची वाढ झाली होती. 

लक्षात ठेवा, वाहनांची तपासणी करण्याचा कुठलाही अधिकार पोलिसांना नाही ! 

19 किलोच्या गॅसच्या किंमतीमध्ये घट

१९ किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ६ रुपयांची घट झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये १५३९ रुपयांचे गॅस सिलिंडर १५३३ रुपये झाले आहे. कोलकातामध्ये याच्या किंमतीमध्ये ५.५ रुपयांची घट झाली आहे.  त्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत १६०४ रुपयांवरुन १५९८.५० रुपये झाली आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये १९ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ५.५ रुपयांनी कमी झाली आहे.