‘नाबार्ड’ कर्जाचा व्याजदर कमी हवा - फडणवीस

पीटीआय
बुधवार, 17 जानेवारी 2018

नवी दिल्ली - कृषी क्षेत्रासाठी त्यातही सिंचनासाठी ‘नाबार्ड’  मार्फत राज्याला मिळणाऱ्या मदतीमध्ये भरघोस वाढ झालेली असली तरी जे कर्ज मिळणार आहे त्याचा व्याजदर कमी असावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या चर्चेवेळी आपण ही मागणी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. येत्या १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्री जेटली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सध्या चर्चा करत आहेत. याच मालिकेत आज फडणवीस यांनी राज्याच्या अपेक्षा व मागण्या जेटली यांच्या कानावर घातल्या. पायाभूत सुविधांमध्ये केली जाणारी भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यांना अधिक कर्ज घेण्याची मुभा केंद्राकडून मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: business news nabard devendra fadnavis