
शापूरजी पालनजी समूहाला त्यांचे कर्ज फेडता यावे, यासाठी त्यांच्याकडील टाटा सन्सचे १८ टक्के समभाग खरेदी करून त्यांची कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्याची ऑफर टाटा सन्सने दिली आहे. शापूरजी पालनजी ग्रुपवर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आपण ही ऑफर देत असल्याचे टाटा सन्सतर्फे मंगळवारी (ता. २२) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.
मुंबई - शापूरजी पालनजी समूहाला त्यांचे कर्ज फेडता यावे, यासाठी त्यांच्याकडील टाटा सन्सचे १८ टक्के समभाग खरेदी करून त्यांची कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्याची ऑफर टाटा सन्सने दिली आहे. शापूरजी पालनजी ग्रुपवर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आपण ही ऑफर देत असल्याचे टाटा सन्सतर्फे मंगळवारी (ता. २२) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आपले कर्ज फेडण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा या हेतूने शापूरजी समूह टाटा सन्समधील आपला हिस्सा गहाण ठेवण्याचा किंवा विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. मिस्त्री समूहाने टाटा समूहातील कुठलेही समभाग विकू नयेत वा गहाण ठेवू नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान टाटा सन्सने ही ऑफर दिली.
SBI ने ग्राहकांना दिली महत्त्वाची माहिती, 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम
शापूरजी समूहाने टाटा सन्समधील आपल्या वाट्यापैकी ८२ टक्के समभाग एक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस आणि आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेसकडे गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा निर्णय रद्दबातल करावा, अशी टाटा समूहाची मागणी आहे. हा व्यवहार तीन हजार ९५७ कोटी रुपयांना झाल्याचे टाटाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
Edited By - Prashant Patil