BYJU'S कंपनी अडचणीत? ‘ही’ आहेत कारणे

केरळ सरकारच्या मंत्र्यांनी कंपनीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. वेगाने विस्तार करण्याच्या प्रयत्नात कंपनीने आक्रमक धोरण आखले होते.
BYJU'S
BYJU'Ssakal

शिक्षण क्षेत्रातील कंपनी BYJU'S च्या अडचणी वाढू शकतात. कारण कंपनी विस्तारासाठी सहाय्यक कंपन्यांकडून कर्ज उभारत आहे. दुसरीकडे केरळ सरकारच्या मंत्र्यांनी कंपनीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. वेगाने विस्तार करण्याच्या प्रयत्नात कंपनीने आक्रमक धोरण आखले होते. मात्र, आता कंपनी कर्मचार्‍यांना कामावरून काढत आहे, कार्यालये बंद करत आहे. त्यासोबतच कंपनीतील कर्मचारी वेतनाबाबत कठोर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

BYJU'S
RBI Meeting : महागाई रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर RBI ने घेतला 'हा' निर्णय

कंपनीने आपल्या उपकंपनी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसकडून 300 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे, आकाश कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, BYJU'S ने कंपनीचा व्यवसाय चालवण्यासाठी ही रक्कम घेतली आहे. BYJU'S ने गेल्या वर्षी आकाशला $1 बिलियनमध्ये विकत घेतले. यावरून कंपनीला आपले कामकाज चालवण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी यासाठी खर्चात कपात आणि टाळेबंदीही करत आहे, मात्र आता या निर्णयांना विरोध सुरू झाला असून केरळ सरकारने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कंपनी राज्यातील कार्यालये बंद करून कर्मचाऱ्यांवर राजीनामे देण्यासाठी दबाव टाकत आहे. केरळ सरकारच्या एका मंत्र्याने या निर्णयावर टीका केली होती. कंपनीच्या माहितीनुसार केरळमधील कोची कार्यालय वगळता इतर सर्व कार्यालये बंद करण्यात आली आहेत.

BYJU'S
Post Office Scheme : फक्त 299 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळणार 10 लाखांचा फायदा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या कामगारांना लक्ष्य साध्य करण्यासाठी सेल्स टीमचा वेळ 14 आठवड्यांवरून 8 आठवड्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता आठवड्यातून दोन ऐवजी एकच सुट्टी दिली जात आहे. अशा परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांचा रोषही वाढत असून ते आपल्या मागण्यांसाठी पुढे येत आहेत.

2020-21 मध्ये तोटा 17 पटीने वाढला

एक वर्षाच्या विलंबानंतर BYJU'S चा ऑडिट रिपोर्ट यावर्षी सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आला आहे. या अहवालात या कंपनीचा तोटा 17 पटीने वाढला असून हा तोटा 4,500 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी हा तोटा 262 कोटी रुपये होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com