परदेशी देणग्यांच्या नियमात बदल

केंद्र सरकारने अधिनियम क्र. जीएसार ५०६ (इ) अंतर्गत परदेशी योगदान (नियमन) दुरुस्ती नियम, २०२२ अंतर्गत महत्त्वाचे बदल केले आले असून, हे बदल एक जुलै २०२२ पासून लागू
Changes in the rules of foreign contribution regulation act
Changes in the rules of foreign contribution regulation actsakal
Summary

नियमबदलाचा उद्देश राष्ट्रीय हितास हानीकारक असलेल्या कोणत्याही क्रियाकलापांसाठी परदेशी योगदान, भेट किंवा परदेशी आदरातिथ्य स्वीकारणे आणि वापरणे प्रतिबंधित करणे हाच आहे.

केंद्र सरकारने अधिनियम क्र. जीएसार ५०६ (इ) अंतर्गत परदेशी योगदान (नियमन) दुरुस्ती नियम, २०२२ अंतर्गत महत्त्वाचे बदल केले आले असून, हे बदल एक जुलै २०२२ पासून लागू झाले आहेत. नियमबदलाचा उद्देश राष्ट्रीय हितास हानीकारक असलेल्या कोणत्याही क्रियाकलापांसाठी परदेशी योगदान, भेट किंवा परदेशी आदरातिथ्य स्वीकारणे आणि वापरणे प्रतिबंधित करणे हाच आहे.

परदेशी नातेवाइकांकडून आलेल्या पैशांची माहिती गृह मंत्रालयाला देणे आवश्यक

भारतातील अनेक आई-वडील वा मुले-मुली नोकरी वा व्यवसायानिमित्त परदेशी वास्तव्य करून आपल्या कुटुंबाला परदेशी चलनात खर्चासाठी पैसे पाठवत असतात. ही रक्कम परदेशी योगदान (विनिमय) कायद्याअंतर्गत ‘योगदान’ मानली जाते. दानकर्ता जर ‘परदेशी नागरिक’ असेल तर एका आर्थिक वर्षात अशी मिळालेली रक्कम रु. एका लाखापेक्षा अधिक असेल तर नियम ६ अंतर्गत अशा योगदानाच्या रकमेची माहिती ३० दिवसांत एफसी फॉर्म-१ दाखल करून गृह मंत्रालयाला देण्याचे बंधन होते. यात आता एक जुलैपासून बदल करण्यात आला असून, परदेशी नागरिकत्व असणाऱ्या सर्व नातेवाईक व्यक्तींकडून एकत्रित मिळणारे योगदान वा भेट रक्कम आर्थिक वर्षात रु. १० लाखांपेक्षा अधिक असल्यास असे योगदान वा भेट मिळाल्याची माहिती, योगदान मिळालेल्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत गृह मंत्रालयाला एफसी १ फॉर्म दाखल करून देण्याचा स्वागतार्ह बदल करण्यात आला आहे.

देणगीअगोदर स्टेट बँकेत खाते असणे आवश्यक

नियम ९ च्या उप-नियम (१) आणि (२)(इ) मध्ये दुरुस्ती केली गेली आहे. आता या नियमाअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या किंवा परदेशी योगदान प्राप्त करण्यासाठी पूर्वपरवानगी मिळवण्याच्या ‘अगोदर’ अर्ज करणाऱ्या संस्थेचे ‘एफसीआरए बँक खाते’ असणे आवश्यक आहे; जे पूर्वी परदेशी देणगी ‘मिळाल्यानंतर’ असणे गरजेचे होते. असे खाते स्टेट बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेतच असले पाहिजे, असे बंधन आहे. एखादी व्यक्ती परकी योगदान ‘प्राप्त झाल्यानंतर’ त्याचा वापर करण्यासाठी एक किंवा अधिक बँकांमध्ये एक किंवा अधिक खाती उघडू शकते. याची अनुमती आहे. तथापि, अशा सर्व खात्यांची माहिती फॉर्म एफसी-६डी मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कोणतेही खाते उघडल्यानंतर पूर्वीच्या १५ दिवसांऐवजी ४५ दिवसांच्या आत गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांना फॉर्म ६डी मध्ये कळविणे बंधनकारक आहे.

योगदानाची त्रैमासिक माहिती अपलोड करण्याचे बंधन मागे

नियम १३बी अंतर्गत नोंदणीकृत संस्थांना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाइटवर) किंवा एफसीआरए वेबसाइटवर त्यांना मिळालेल्या परदेशी वर्गणी/भेट/योगदानाची त्रैमासिक माहिती अपलोड करण्याचे बंधन आहे. या नियमात आता एक जुलैपासून बदल करण्यात आला असून, अशी माहिती देण्याचे बंधन मागे घेण्यात आले आहे.

बदलाची मुदत १५ दिवसांपासून ४५ दिवस

नियम १७ए च्या विद्यमान तरतुदींनुसार, कलम १२ अंतर्गत नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा कायद्याच्या कलम ११ अंतर्गत पूर्वपरवानगी मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा बदलाच्या पूर्वी १५ दिवसांच्या आत विहित फॉर्ममधील पुढील बदल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचित करावे लागत होते. ती मुदत आता ४५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

पुनरावृत्तीसाठी अर्ज

नियम २० च्या विद्यमान तरतुदींनुसार, कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाच्या पुनरावृत्तीसाठी अर्ज करण्याची तरतूद एका साध्या कागदावर सचिव, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडे रु. ३००० शुल्क भरल्यास इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल करता येऊ शकणारा बदल केला आहे.

नं. फॉर्म नंबर झालेला बदल

१ एफसी ६ए संस्थेच्या नाव व राज्यातील पत्त्यातील बदल

२. एफसी ६बी संस्थेचे स्वरूप, उद्देश, उद्दिष्टे, नोंदणीचा पत्ता बदल

३ एफसी ६सी परदेशी वर्गणी बँक खाते बदल वा शाखा बदल

४ एफसी ६डी परदेशी वर्गणी अलाहिदा खाते उघडणे

५ एफसी ६इ संस्थेच्या प्रमुख व्यक्ती बदलणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com