क्रिसिल'ने विकासदराचा अंदाज घटवला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

मुंबई: विविध औद्योगिक क्षेत्रांना मंदीने ग्रासल्याने पहिल्या तिमाहीत विकासदर पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. मंदीच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंक, मुडीज, इंडिया रेटिंग्ज या संस्थांपाठोपाठ "क्रिसिल' या संस्थेनेही विकासदराचा अंदाज घटवला आहे. चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्था केवळ 6.3 टक्‍क्‍यांनी वृद्धिंगत होईल, असा नवा अंदाज "क्रिसिल'ने गुरुवारी (ता.5) जाहीर केला. यापूर्वी "क्रिसिल'ने 6.9 टक्‍के विकासदराचा अंदाज व्यक्‍त केला होता. 

अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडली आहे. मंदीचा परिणाम वस्तुस्थितीपेक्षाही व्यापक असेल, अशी भीती "क्रिसिल'ने व्यक्त केली आहे. पहिल्या तिमाहीत मंदीचे परिणाम दिसून आले. वस्तूंचा खप, कारखाना उत्पादनातील घसरण आणि निर्यातीची सुमार कामगिरी याचे मोठे पडसाद अर्थव्यवस्थेवर दिसून आल्याचे "क्रिसिल'ने अहवालात म्हटले आहे. 2013 मधील तिसऱ्या तिमाहीत वस्तूंचा खप उणे 0.9 टक्के आणि 2015 च्या आर्थिक वर्षात तो केवळ 2.1 टक्के होता. त्यामुळे चालू वर्षात विकासदर जेमतेम 6.3 टक्के राहील, असा नवा अंदाज संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या सहामाहीत विकासदरात वाढ होईल, असा आशावाद "क्रिसिल'कडून व्यक्त करण्यात आला आहे. 

जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकासदर 5.8 टक्के राहिला होता. एप्रिल ते जून या तिमाहीत तो 5 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला. नुकताच रिझर्व्ह बॅंकेने विकासदराचा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. चालू वर्षात विकासदर 7 टक्‍क्‍यांऐवजी 6.9 टक्के राहील, असे आरबीआयने म्हटले होते. मुडीज या संस्थेनेही चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज 6.8 टक्‍के केला, तसेच पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज 0.6 टक्‍क्‍यांनी कमी केला होता. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CISIL ALSO Decreased GROWTH rate