esakal | सोन्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; आता विक्रीपूर्वी 'हे' आवश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

Commerce Ministry approves mandatory gold hallmarking

सोन्याच्या दागिन्यांसाठी आता हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात येणार आहे

सोन्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; आता विक्रीपूर्वी 'हे' आवश्यक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सोन्याच्या दागिन्यांसाठी आता हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात येणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने या विधेयकाला मंजुरी दिली असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले आहे. लवकरच हा निर्णय जागतिक व्यापार संघटनेला कळविला जाणार असून पुढील दोन महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता हॉलमार्किंग असल्याशिवाय दागिने विकता येणार नाही. 

सोन्याच्या शुद्धतेनुसार 24, 22 आणि 18 कॅरेट या स्वरूपात त्याचे वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरण सोन्याच्या दागिन्यांवर किंवा वस्तूंवर देणे हे याअगोदर ऐच्छिक होते. मात्र यापुढे ते अनिवार्य केले जाईल. ग्राहक मंत्रालयाच्या अखत्यारीत द ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) ही संस्था हॉलमार्किंगची तपासणी करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजन्सीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्यानंतर त्यावर हॉलमार्क दिला जातो. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही आणि ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष तसेच उत्पादकाचा लोगोही असतो.

सध्या, देशभरात सुमारे 800 हॉलमार्किंग केंद्रे आहेत आणि दागिन्यांपैकी केवळ 40 टक्के दागिने हॉलमार्क केलेले आहेत.

शुद्ध सोने
24 कॅरेटचे सोने हे शुद्ध असते. 24 कॅरेटमध्ये सोन्याचे प्रमाण 99.9 टक्के असते , म्हणजे यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते.
22 कॅरेटमध्ये 91.66 टक्के सोने असते.
18 कॅरटमध्ये 75 टक्के सोने असते.

loading image