esakal | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना समजून घ्या 'रिस्क'
sakal

बोलून बातमी शोधा

risk and return while investing

डायव्हर्सिफाइड फंड आणि इंडेक्स फंड हे बॅलन्स्ड फंडांपेक्षा थोडी अधिक जोखीम घेतात पण दीर्घ काळात चांगला परतावा देण्याची क्षमता बाळगतात.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना समजून घ्या 'रिस्क'

sakal_logo
By
डॉ. वीरेंद्र ताटके

तिळगुळ वाटणे आणि पतंग उडविण्याचा आनंद घेणे हे संक्रांत  सणाचे वैशिष्ट्य मानले जाते . थोडा विचार केला तर लक्षात येते की म्युच्युअल फंड गुंतवणूकरूपी पतंग उडवताना त्यातील जोखीम समजावून घेतली तर वर्षभर आपण परताव्यारुपी तिळगुळाचा आनंद घेऊ शकतो. प्रत्येक म्युच्युअल फंडाची स्वतःची अशी रिस्क म्हणजे जोखीम असते .त्या रिस्ककडे कानाडोळा करून फक्त चांगल्या परताव्याच्या लोभाने त्यात गुंतवणूक केली तर आपला पतंग हेलकावे खाऊ शकतो  आणि कदाचित पतंग काटला देखील जाऊ शकतो .आपला पतंग जेवढा उंच जाईल तेवढा परतावा मिळण्याची संधी वाढेल पण तेवढीच जोखीमसुद्धा वाढेल हे लक्षात ठेवले पाहिजे.

बिझनेस क्षेत्रातील बातम्या आणि लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उदाहरणार्थ  बॅलन्सड फंड त्यांची पूर्ण रक्कम शेअर बाजारात गुंतवीत नसल्यामुळे तुलनेने  सुरक्षित असतात . अर्थात परतावा देण्याची त्यांची क्षमता इतर इक्विटी फंडांपेक्षा कमी असते . या उलट एखाद्या ' थीम ' वर आधारित गुंतवणूक करणारे थीमॅटीक फंड  किंवा एकच क्षेत्रात गुंतवणूक करणारे सेक्टरल फंड तुलनेने खूप जास्त  जोखीम घेतात पण तेवढाच अधिक परतावा देण्याची क्षमता बाळगतात .  डायव्हर्सिफाइड फंड आणि इंडेक्स फंड हे बॅलन्स्ड फंडांपेक्षा थोडी अधिक जोखीम घेतात पण दीर्घ काळात चांगला परतावा देण्याची क्षमता बाळगतात . लार्ज कॅप फंड आणि मिडकॅप - स्मालकॅप फंड  हे त्यांच्या नावाप्रमाणे अनुक्रमे मोठ्या आणि छोट्या आकाराच्या कंपनांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे त्यांची जोखीम आणि परतावा वेगवेगळा असतो.

बिझनेस क्षेत्रातील बातम्या आणि लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे  इक्विटी म्युच्युअल फंडांचे हे सर्व प्रकार आणि त्यातील जोखीम शांतपणे समजावून घेतली पाहिजे  . आणि  गुंतवणुकीतील समतोल साधण्यासाठी केवळ चांगला परतावा देणाऱ्या फंडांचा अट्टाहास न धरता  वेगवेगळ्या प्रकारच्या निवडक इक्विटी   फंडांचा समावेश  आपल्या पोर्टफोलिओमध्ये केला पाहिजे . 

थोडक्यात , मिळणारा परतावा आणि आपण घेत असलेली जोखीम यांचा मेळ घालून जर म्युच्युअल फंड रुपी पतंग उडवला तर आपण कायमच आनंदी राहू शकतो. 

बॅलन्स्ड फंड (हायब्रीड फंड) : या योजनेत पूर्वनिर्धारित गुंतवणूक उद्दिष्टांनुसार "इक्विटी' आणि निश्‍चित उत्पन्न देणाऱ्या असा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूक साधनांमध्ये करतात. 

थिमॅटिक फंड : एका विशिष्ट संकल्पनेशी जवळून संबंधित असलेल्या (उदा. पायाभूत सोयी) क्षेत्रसमूहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी योजना म्हणजे थिमॅटिक फंड होत. 

बिझनेस क्षेत्रातील बातम्या आणि लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डायव्हर्सिफाईड फंड : या फंडाद्वारे विविध "ऍसेट क्‍लास'मध्ये आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. विविधतेतून पोर्टफोलिओमधील जोखीम कमी करण्याचा प्रयत्न यात असतो. 

इंडेक्‍स फंड : हे पॅसिव्ह (निष्क्रिय) या प्रकारात मोडतात व त्यांचे खर्चाचे प्रमाण कमी असते. हे फंड ज्या इंडेक्‍सवर (निर्देशांकावर) आधारीत असतात, त्या इंडेक्‍समधील सर्व शेअरमध्ये कमी-अधिक गुंतवणूक केली जाते. 

लार्ज कॅप फंड : आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. ज्या वर्षाकाठी स्थिर वाढ आणि जास्त नफा दर्शविण्याची अधिक शक्‍यता असते. 

स्मॉल-मिड कॅप फंड : लहान ते मध्यम मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.