मुंबईकरांच्या घरखरेदी खर्चात कोविडनंतर 55 टक्के घट | Real estate update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Real Estate

मुंबईकरांच्या घरखरेदी खर्चात कोविडनंतर 55 टक्के घट

मुंबई : कोविडचा विळखा (corona pandemic) सैलावत असताना एकीकडे देशातील बांधकाम क्षेत्रही वाढ दाखवीत (real estate) आहे. मात्र मुंबईसारख्या (Mumbai) प्रमुख शहरात मात्र नागरिकांच्या घरखरेदीवरील (house purchasing expenses) खर्चात 55 टक्के घट (55% Decreases) झाली आहे.

हेही वाचा: मुरबाड : बारवी धरण प्रकल्पग्रस्त अजूनही सुविधांपासून वंचित

अर्थात असे असले तरी भारतीय घरबांधणी क्षेत्र येती किमान तीन वर्षे दरवर्षी 75 टक्के वाढणार आहे, असेही यासंदर्भातील एका पहाणी अहवालात म्हटले आहे. सध्या भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राचा व्याप 200 अब्ज अमेरिकी डॉलर असून तो 2025 पर्यंत साडेसहाशे अब्ज डॉलरपर्यंत तर 2030 पर्यंत एक लाखकोटी डॉलरपर्यंत जाईल, असेही त्यात नमूद केले आहे.

कोविडमुळे मजुरांची टंचाई झाली तसेच लोकांनी खर्च करण्यातही हात आखडता घेतला. मात्र यावर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत बंगळुरू, चेन्नै व दिल्ली एनसीआर विभागात परिस्थिती अत्यंत वेगाने पूर्वपदावर आली. पण मुंबईतील स्थिती अत्यंत संथपणे पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. घरखरेदी करू इच्छिणाऱ्यांनी येत्या तीन महिन्यांमध्येच घर घेण्याचे ठरविले आहे. मात्र मुंबईचा ट्रेंड बरोबर त्याविरुद्ध असून मुंबईकरांच्या निवासी घरखरेदी खर्चात 55 टक्के घट झाली असून हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.

व्यापारी बांधकामे भाड्याने देण्याच्या व्यवहारातही अन्य शहरांमध्ये या तिमाहीत वाढ होत असून, त्यात आयटी क्षेत्राचा वाटा 34 टक्के राहिला आहे. पण मुंबईत यावर्षीच्या एप्रिल ते जून मध्ये तीस लाख चौरस फुटांचे झाले होते तर त्यानंतरच्या तिमाहीत जेमतेम 15 लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. मात्र लौकरच ही स्थिती पालटेल अशी आशाही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. कोविडची साथ थंडावल्यावर देशभरात रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी सुरु झाली. मात्र मुंबईतील तेजी अजूनही खऱ्या अर्थाने आली नाही. उलट ऑफिसच्या जागा भाड्याने देण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर निवासी घरांची खरेदीही कमी झाली आहे, असे इन्फोमेरिक्स रेटिंगच्या अहवालात म्हटले आहे.

loading image
go to top