आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट
crude oil fall in international market Petrol-Diesel rates
crude oil fall in international market Petrol-Diesel rates sakal

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ९१ डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असले तरी देशातील पेट्रोल-डिेझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याबद्दल नुकतीच एक माहिती जारी केली आहे.

त्यानुसार सध्या देशात सर्वात स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल पोर्टब्लेअर येथे विकले जात आहे. तिथे पेट्रोलची किंमत ८४.१० रुपये प्रती लिटर तर डिझेलची किंमत ७९.७४ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. याआधी २२ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील जकात कर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्राने जुलै महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. मात्र, देशातील इतर कुठल्याही राज्याने या दरम्यान किमती कमी करण्याचा प्रयत्न केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com