इराणवरील निर्बंधामुळे  खनिज तेलाची भाववाढ 

रॉयटर्स
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सिंगापूर - इराणवरील निर्बंधामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा कमी होण्याच्या शक्‍यतेने सोमवारी भावात वाढ झाली. जागतिक पातळीवर व्यापार संबंधांत निर्माण झालेले तणावही तेलाचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. 

आज खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल ७२.८८ डॉलरवर गेला. इराणवरील नवे निर्बंध अमेरिकेने लागू केले आहेत. याचा परिणाम नोव्हेंबरपासून इराणच्या खनिज तेल क्षेत्रावर होणार आहे. या निर्बंधांमुळे इराणच्या तेल निर्यातीवर नेमका किती परिणाम होत आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इराणकडून तेल पुरवठा कमी झाल्यास जागतिक पातळीवर पुरेसा पुरवठा होण्याची शक्‍यता कमी आहे. पुरवठा कमी झाल्यास तेलाचे भाव भडकणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crude oil prices rise

टॅग्स