esakal | शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

CSB Bank IPO opens today

सीएसबी बॅंकेचा "आयपीओ' आजपासून खुला 

शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : केरळस्थित सीएसबी बॅंकेची (आधीची कॅथोलिक सीरियन बॅंक) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून सुरू होणार आहे. येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रतिशेअर 193-195 रुपयांचा किंमतपट्टा निश्‍चित केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 410 कोटी रुपयांचे भांडवल उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. 

गुंतवणूकदारांना किमान 75 शेअरसाठी अर्ज करता येईल. यापेक्षा अधिक शेअर खरेदी अर्ज करावयाचा असल्यास 75 च्या पटीत करणे आवश्‍यक आहे. कंपनीच्या प्रारंभिक हिस्सा विक्री योजनेत "फ्रेश इश्‍यू' आणि विद्यमान भागधारक "ऑफर फॉर सेल'द्वारे सुमारे 1.97 कोटी शेअरची विक्री करतील. यामध्ये आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि एडलवाईज टोकियो लाइफ इन्शुरन्स मिळून बॅंकेतील 5.19 टक्के हिस्सा विकणार आहेत. तर फेडरल बॅंक 1.6 टक्के हिस्सा विकणार आहे. बॅंकेच्या शेअरची मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे.