
देशातील आघडीचा उद्योग समूह असलेल्या टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यात गेल्या चार वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु होती. शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं टाटा सन्सच्या बाजूनं निर्णय दिला. टाटा उद्योग समूहाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आलेला निर्णय योग्य असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. हा निर्णय देताना नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (एनसीएलएटी) यांच्याकडून मिस्त्री यांना बहाल करण्यात आलेले अध्यक्षपदही रद्द ठरविण्यात आले आहे. १८ डिसेंबर २०१९ रोजी एनसीएलएटीने मिस्त्री यांना पद बहाल केले होते. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, ए. एस. बोपन्ना आणि व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. याप्रकरणावर सायरस मिस्त्री यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आपण व्यक्तिशः निराश झालो आहे. आपण जे काही केलं ते प्रामाणिकपणाणं केलं. यामागील आपला विवेक स्पष्ट होता आणि आहे. त्यामुळेच आजही आपणाला शांत झोप लागते, अशी प्रतिक्रिया सायरस मिस्त्री यांनी दिली.
शुक्रावारी सुप्रीम कोर्टानं टाटा सन्सच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी आपलंनिवेदन जारी केलं. ज्यात ते म्हणतात की, या निकालाने आपण प्रचंड निराश झालो. टाटा समूहात चांगल्या नेतृत्वाबद्दल आपण गेले चार वर्ष झगडत होतो. संचालकांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे आणि या टाटा समूहातील निर्णय प्रक्रिया पारदर्शक असावी आणि सुशासन असावे, असा आपला आग्रह होता. यापुढे टाटा समूहात समभागधारकांच्या हक्कांचे आणि मूल्यांचे संरक्षण होईल, असा आशावाद मिस्त्री यांनी व्यक्त केला. त्याशिवाय यापुढे कोणत्याही निर्णयात आपण थेट ढवळाढवळ करणार नाही, असेही मिस्त्री यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
काय घडलं होतं?
सायरस मिस्त्री यांचे कुटुंब टाटा सन्समध्ये भागीदार आहेत. टाटा सन्सचे 18.5 टक्के शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत. बाकीची भागीदारी टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या इतर कंपन्यांकडे आहे. ऑक्टोबर 2016मध्ये टाटा सन्सने मिस्त्री यांना कार्यकारी अध्यक्षपदावरून हटविले होते. त्यानंतर टाटा समूह आणि मिस्त्री यांच्या उद्योग समूहात कायदेशीर लढाईला सुरुवात झाली होती. सायरस मिस्त्री यांचे वडील शापूरजी पल्लोनजी यांच्या मालकीचा शापूरजी पल्लोनजी उद्योगसमूह आहे. टाटा कुटुंबाचे ते नातेवाईकही आहेत. सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीच्या निर्णयाला मिस्त्री कुटुंबाने कोर्टात आव्हान दिले होते. सायरस मिस्त्री यांना अचानक पदावरून हटविणे हा एक प्रकारचा घात असून, कार्पोरेट नियमांना धरून नाही. कार्पोरेट गव्हर्नन्सच्या तत्वांमध्ये हे बसत नाही, असं शापूरजी पल्लोनजी उद्योगसमूहानं म्हटलं होतं. टाटा सन्सने हे सगळे आरोप फेटाळले होते. संचालक मंडळाला मिस्त्री यांना हटविण्याचा अधिकार होता. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली होती.
देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
चार वर्षांत हकालपट्टी
टाटा उद्योग समूहात रतन टाटांचे वारसदार म्हणून 2012मध्ये सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण उद्योग समुहाची सूत्रे मिस्त्री यांच्याकडे होती. परंतु, चार वर्षांतच मिस्त्री यांनी नाट्यमयरित्या हकालपट्टी करण्यात आली. गेल्या काही वर्षांत कोर्टातील ही लढाई देशातील सर्वांत हाय प्रोफाईल लढाई गणली जात होती. देशतील कर्पोरेट आणि उद्योग जगताचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष लागलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.