esakal | D Mart |'डी-मार्ट'चा मार्केटमध्ये बोलबाला, 2021मध्ये स्टॉक 70% वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

D-mart

'डी-मार्ट'चा मार्केटमध्ये बोलबाला, 2021मध्ये स्टॉक 70 टक्के वाढला

sakal_logo
By
ओमकार वाबळे

अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या मालकीची हायपरमार्केट चेन डी-मार्ट कंपनी बाजार भांडवलानुसार टॉप 15 महत्वाच्या कंपन्यांमध्ये जाऊन बसली आहे.

सोमवारी डीमार्टची एम-कॅप 3 ट्रिलियन पर्यंत पोहोचली. शेअर मार्केटमध्ये डी-मार्ट 4,800 या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचली. मार्केट बंद होण्यापूर्वी 4,716 रु शेअर्सची किंमत होती. सन 2021 मध्ये हा स्टॉक 70 टक्क्यांनी वाढला आहे. देशभरात सणांचे दिवस सुरू असल्याने किराणा खरेदीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच डी-मार्टच्या रिटेल चेनने मध्यम वर्गाचे लक्ष्य खेचले आहे.

11 ऑक्टोबर रोजी, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स 7.06% वर चढून 4,719.60 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. त्यावेळी बाजार भांडवल 3,05,710.79 कोटी रुपये होते. एशियन पेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो आणि कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, एसबीआय, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एचयूएल आणि इन्फोसिस यांच्यानंतर आता मार्केट कॅपनुसार ही 15 व्या क्रमांकाची कंपनी आहे.

2002 मध्ये स्थापन झालेल्या डी-मार्टने आर्थिक वर्ष २००९, २०१९ आणि २०२१ मध्ये विक्री आणि नफ्यात मोठी वाढ पाहिली. महामारीमुळे आर्थिक वर्ष २०२१ प्रभावित झाले. मात्र कंपनीने आर्थिक घोडदौड कायम ठेवली. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत डी-मार्टची कमाई दरवर्षी 46% वाढून 7,649.64 कोटी रुपये झाली असेल. वर्षभरापूर्वी हा आकडा 5,218.15 कोटी रुपये होता.

मुंबईत डी-मार्टची विक्री 123 टक्क्यांनी वाढली आहे. आता अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि फरीदाबादमध्येही कंपनीने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबई मॉडेल फायदेशीर झाल्यावर त्यांचा ई-कॉमर्स व्यवसाय आणखी वेगाने वाढेल. डीमार्टचे आता एकूण 246 स्टोअर्स झाले आहेत. सध्या 11 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात त्यांच्या शाखा आहेत.

loading image
go to top