सोन्याच्या भावात दुसऱ्या दिवशीही घसरण, चांदीची चमकही झाली कमी

वृत्तसंस्था
Monday, 15 June 2020

मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ०.४ टक्क्यांपेक्षा अधिकने घसरून दहा ग्रॅमला ४६,८४४ रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो ४७,०८९ रुपये झाला आहे. चांदीच्या भावात ०.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. 

भारतीय बाजारांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोन्यावर झाला आहे.
मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ०.४ टक्क्यांपेक्षा अधिकने घसरून दहा ग्रॅमला ४६,८४४ रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो ४७,०८९ रुपये झाला आहे. चांदीच्या भावात ०.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारतात सराफा बाजार खुला झाल्यानंतरही सोन्याची मागणी घटलेलीच आहे. देशांर्गत बाजारपेठेत सोन्याच्या भावात १२.५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के जीएसटीचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. प्रचंड अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार सुरू आहे. 

* सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव घसरले
* एमसीएक्सवर सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४६,८४४ रुपये
* एमसीएक्सवर चांदीचा भाव प्रति किलो ४७,०८९ रुपये
* जागतिक परिस्थितीचा सोने आणि चांदीच्या भावावर दबाव

जागतिक बाजारांत चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. मागील आठवड्यात सोन्याच्या भावात २.५ टक्क्यांची वाढ झाली होती. चांदी आणि प्लॅटिनमच्या भावातसुद्धा वाढ नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी जगातील सर्वात मोठ्या गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील गुंतवणूक ०.१ टक्क्यांनी वाढून १,१३६.२२ टनांवर पोचली होती. तर भारतात गोल्ड ईटीएफमध्ये मे महिन्यात गुंतवणूकदारांनी ८१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कोविड-१९ महामारीचे संकट आणि शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराकडे वळले होते. एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांनी ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये केली होती.

सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे यावर्षी मागणीवर परिणाम झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वर्षभरात सोन्याच्या भावात २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षी सोन्याने २५ टक्के परतावा दिला होता.

सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. वर्ष 2008 मध्ये देखील आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला होता. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decline in gold & silver prices