डीएचएफएलचा एऑन कॅपिटलबरोबर 10 हजार 200 कोटींचा करार होणार? 

डीएचएफएलचा एऑन कॅपिटलबरोबर 10 हजार 200 कोटींचा करार होणार? 
Updated on

मुंबई: डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.) विशेष परिस्थितीतील गुंतवणूकदार म्हणून एऑन कॅपिटलबरोबरच्या 1.5 अब्ज डॉलरचा (जवळपास 10,200 कोटी रुपये) कराराची आज घोषणा करण्याची शक्यता आहे. या व्यवहारामुळे डीएचएफएलच्या शेअरचा मोठा हिस्सा एऑन कॅपिटलच्या मालकीचा होणार आहे. या व्यवहारामुळे कर्जबाजारी डीएचएफएलला 10,200 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर डीएचएफएलमधील प्रमोटर्सच्या शेअरचा हिस्सा 10 टक्क्यांवर येणार आहे. 

एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती आली आहे. येस बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र हे डीएचएफएलचे मुख्य वित्त पुरवठादार आहेत. त्याचबरोबर या व्यवहारानंतर कोटक एएमसी, अॅक्सिस म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड, फ्रॅंकलिन म्युच्युअल फंड आणि डीएसपी म्युच्युअल फंड यांनादेखील दिलासा मिळणार आहे. याआधी कर्जदारांनी डीएचएफएलला 80,000 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी सहा महिन्यांचा कायदेशीर अवधी देण्याच्या शक्यतेचेही चर्चा होती. 

कंपनीच्या कर्जाची पुनर्बांधणी करण्याचा प्लॅन 25 जुलैपर्यत सादर करण्यात येणार आहे आणि या प्लॅनची अंमलबजावणी 25 सप्टेंबरच्या आत होणार आहे. त्यामुळे डीएचएफएला रोकडची उपलब्धता करण्याची संधी मिळणार आहे. मार्चअखेर डीएचएफएलने 2,223 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com