esakal | नवीन वर्षात व्हा 'डिजिटल' गुंतवणूकदार!
sakal

बोलून बातमी शोधा

digital-investment

बहुतांश गुंतवणूक ‘डिजिटल’ पद्धतीने करणे शक्‍य झाले आहे. ही आहे तंत्रज्ञानाची कमाल! आता बऱ्याचशा गुंतवणुका आपण घरबसल्या, पेपरलेस पद्धतीने करू शकता. चला तर‘डिजिटल’ पद्धतीने गुंतवणूक करूया. 

नवीन वर्षात व्हा 'डिजिटल' गुंतवणूकदार!

sakal_logo
By
अतुल सुळे

‘डिजिटल’ क्रांतीमुळे गुंतवणूक करण्याची पारंपरिक पद्धतदेखील बदलली आहे. ‘इंटरनेट’च्या जमान्यामध्ये गुंतवणूक करणे व संबंधित रेकॉर्ड सांभाळणे खूपच सोपे व सुटसुटीत झाले आहे. कारण, आता बहुतांश गुंतवणूक ‘डिजिटल’ पद्धतीने करणे शक्‍य झाले आहे. ही आहे तंत्रज्ञानाची कमाल! आता बऱ्याचशा गुंतवणुका आपण घरबसल्या, पेपरलेस पद्धतीने करू शकता. चला तर‘डिजिटल’ पद्धतीने गुंतवणूक करूया. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याकडे शिल्लक (सरप्लस) किती आहे हे जाणून घेणे आवश्‍यक असते. त्यासाठी अनेक ‘मनी मॅनेजमेंट ॲप्स’चा  वापर करून आपले दर महिन्याचे उत्पन्न व खर्च आपण ‘ट्रॅक’ करू शकता. 

गुंतवणूक करताना सर्व ठिकाणी ‘पॅन कार्ड,’ ‘आधार कार्ड,’ ‘ड्रायव्हिंग लायसेन्स’ची ॲटेस्टेड कॉपी घ्यावी लागते. ती तुम्ही ‘डिजी लॉकर’मध्ये स्टोअर करू शकता, अथवा स्कॅन केलेली कॉपी व्हॉटसॲप/ ई-मेलने पाठवू शकता. अधिक माहितीसाठी: https://digilocker.gov.in/ 

तुमची विम्याची पॉलिसीसुद्धा ‘ई-इन्शुरन्स अकाऊंट’मध्ये ‘डी-मॅट’ स्वरूपात ठेवू शकता. 

शेअरमध्ये गुंतवणूकीसाठी ‘थ्री-इन-वन’ अकाउंट वापरून ‘पेपरलेस’ पद्धतीने गुंतवणूक करू शकता. या पद्धतीत तुमचा ब्रोकरकडील ट्रेडिंग अकाऊंट, बॅंक खाते व ‘डी-मॅट’ खाते एकमेकांना ‘लिंक’ केलेले असते व त्यामुळे चेक, ‘डिलिव्हरी इन्स्ट्रक्‍शन स्लिप’ देण्याची गरज उरत नाही.  

सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी ब्रोकरमार्फत ‘गोल्ड ईटीएफ’ खरेदी करता येतात अथवा ‘सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड्‌स’ ‘डिमॅट’ स्वरुपात ‘ऑनलाइन’ पद्धतीने खरेदी करता येतात. 

loading image
go to top