Elon Muskच्या 'त्या' ट्विटनंतर 'Dogecoin'च्या किमतीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dogecoin

Elon Musk यांच्या 'त्या' ट्विटनंतर 'Dogecoin'च्या किमतीत वाढ

Dogecoin meme cryptocurrencyसाठी टेस्ला आणि SpaceX चे मालक एलॉन मस्क यांचे समर्थन कोणापासूनही लपलेले नाही. मस्क हे डॉजकॉइनच्या सुरुवातीपासूनच समर्थक आहेत आणि त्यांची विधाने अनेकदा या नाण्याच्या किंमतीवर परिणाम करतात. पुन्हा एकदा एलॉन मस्कने DOGE बद्दल ट्विट केले, ज्याचा Dogecoin च्या किंमतीवर मोठा प्रभाव झाला आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या मुलाला शिबा इनू कुत्रे खूप आवडतात. येथे तुम्ही शिबा इनू नाण्यावरून त्याचा अर्थ घेऊ नये. वास्तविक डॉजकॉइन ही शिबा इनू कुत्र्याच्या जातीवर आधारित एक मेम क्रिप्टोकरन्सी आहे आणि एलोन मस्कयांनी या ट्विटमध्ये उल्लेख केलेला शिबा इनू डॉजकॉइनच्या लोगोमध्ये दिसलेल्या शिबा इनू कुत्र्याशी संबंधित आहे. मस्कच्या या ट्विटचा परिणाम थेट डॉजकॉइनच्या किमतीवर दिसून आला आणि नाण्याच्या किमतीत मोठी उसळी आली.

शिबा इनू नावाच्या या ट्विटनंतर डॉजकॉइनची किंमत लगेचच 4% वाढली. ट्विटमध्ये मस्कने लिहिले की, "XAEA-XII Doges कुत्रे खूप आवडतात". येथे Doges द्वारे त्याचा अर्थ Dogecoin असा होतो. ट्विटमध्ये एका व्हिडिओचा उल्लेख आहे ज्यामध्ये त्याचा मुलगा अनेक शिबा इनू कुत्र्यांसह खेळत आहे. याआधीही एलॉन मस्क यांच्या ट्विटनंतर डॉजकॉइनच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती.

यापूर्वी मस्कने फ्लोकी इनूचा फोटो ट्विटरवर पोस्ट करण्याचे आश्वासन दिले होते. फ्लोकी इनू हे एलॉन मस्क यांच्या शिबा इनू कुत्र्याचे नाव आहे. त्याच धर्तीवर फ्लोकी इनू मीम कॉईन देखील बनवण्यात आले आहे. मस्कच्या ट्विटनंतर फ्लोकी इनूच्या किमतीने जबरदस्त उसळी मारली आणि त्यात अचानक 16% वाढ झाली.

हेही वाचा: Elon Musk नी दिले नवे संकेत; Twitter आणि Tesla यांचं विलिनीकरण होण्याची शक्यता

Web Title: Dogecoin Price Spikes After Elon Musks That Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..