कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना ‘आयटीआर’ची गरज नाही?

यंदाच्या वर्षी ७५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना काही निकषांतर्गत कितीही उत्पन्न असले, तरी प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागणार नाही
Dr Dilip Satbhai writes Which senior citizens do not need ITR
Dr Dilip Satbhai writes Which senior citizens do not need ITRsakal
Summary

यंदाच्या वर्षी ७५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना काही निकषांतर्गत कितीही उत्पन्न असले, तरी प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागणार नाही

केंद्रीय अर्थसंकल्पात ७५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी काही पात्रतानिकष पूर्ण केल्यास त्यांना कितीही करपात्र उत्पन्न असतानादेखील प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नसल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती. त्याप्रमाणे यंदाचे वर्ष हे अशा प्रकारची सवलत मिळविण्यासाठीचे खऱ्या अर्थाने पहिले वर्ष आहे. या संदर्भात, प्राप्तिकर कायदा, १९६१ मध्ये कलम १९४ पी समाविष्ट केले असून, त्यात ही सवलत निर्दिष्ट केलेली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी ७५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना काही निकषांतर्गत कितीही उत्पन्न असले, तरी प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागणार नाहीत, म्हणून हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे.

काय आहे ही सवलत?

  • कलम १९४ पी नुसार, ज्येष्ठ नागरिकांनी पुढील निकष पूर्ण केल्यास त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची आवश्यकता नाही-

  • ज्येष्ठ नागरिक जो भारतातील रहिवासी आहे, त्याने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये त्याच्या आयुष्याची ७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजेत.

  • ज्येष्ठ नागरिकास सरकारने ‘केवळ एकाच’ अधिसूचित केलेल्या निर्दिष्ट बँकेमध्ये निवृत्तीवेतन, व्याज मिळत असले पाहिजे आणि इतर कोणतेही उत्पन्न असता कामा नये.

  • ज्येष्ठ नागरिकाने संबंधित बँकेला उत्पन्नासंदर्भात घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. घोषणापत्रामध्ये जसे तपशील अपेक्षित असतील, तशा स्वरुपात आणि विहित केलेल्या पद्धतीने मजकूर भरून तो खरा असल्याचे सत्यापित केले पाहिजे.

खाते शेड्युल्ड बँकेतच

सरकारने या संदर्भात दोन सप्टेंबर २०२१ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ज्येष्ठ नागरिक आपले खाते असलेल्या कोणत्याही शेड्युल्ड बँकेत असे घोषणापत्र सादर करू शकतात. त्यानंतर जर ज्येष्ठ व्यक्तीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये त्यांच्या उत्पन्नातून ‘टीडीएस’साठी बँकेकडे जुन्या प्रणालीनुसार घोषणा सादर केली असेल, तरच करकपात केली जाईल. जर गेल्या आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिकाने घोषणापत्र सादर केले नसेल, तर मात्र विवरणपत्र (आयटीआर) दाखल करणे आता बंधनकारक आहे.

करपात्र उत्पन्नाची मोजणी कशी?

ज्येष्ठ नागरिकाने फॉर्म क्रमांक १२ बीबीए वापरून घोषणापत्र सादर केल्यावर बँक पेन्शन आणि व्याजाची बेरीज करेल. त्यानंतर संबंधित बँक वजावटी, करमुक्त उत्पन्न आणि करसवलती, पुराव्याच्या आधारे लक्षात घेऊन जुन्या करप्रणालीअंतर्गत करकपात करेल. ज्येष्ठ नागरिकाने नव्या करप्रणालीची निवड केल्यास, गुंतवणुकीचे पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या व्यक्तीने एकदा बँकेकडे घोषणापत्र सादर केले की, करदात्यास करप्रणाली बदलता येणार नाही. कलम १९४ पी अंतर्गत कपात केलेल्या प्राप्तिकरासाठी बँक फॉर्म १६ जारी करेल. प्राप्तिकर विभागाने २०२१ मध्ये फॉर्म १६ मध्ये बदल केला आहे. आता त्यात ज्येष्ठ नागरिकाचे पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक, पॅन, पत्ता आदी माहिती तपशीलांसह उपलब्ध केली आहे.आतापर्यंत ७००० पेक्षा अधिक करदात्यांनी याचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकारने ही वजावट ज्येष्ठ नागरिकांना प्रायोगिक तत्वावर दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com