म्युच्युअल फंड : एका फंडाचा वाढदिवस

साधारणपणे ३१ मार्च जवळ आला, की प्राप्तिकरातून सूट मिळविण्यासाठी आवश्यक असलेले गुंतवणूकपर्याय शोधण्यासाठी करदात्यांची धावाधाव सुरु होते.
Mutual Fund
Mutual FundSakal
Summary

साधारणपणे ३१ मार्च जवळ आला, की प्राप्तिकरातून सूट मिळविण्यासाठी आवश्यक असलेले गुंतवणूकपर्याय शोधण्यासाठी करदात्यांची धावाधाव सुरु होते.

साधारणपणे ३१ मार्च जवळ आला, की प्राप्तिकरातून सूट मिळविण्यासाठी आवश्यक असलेले गुंतवणूकपर्याय शोधण्यासाठी करदात्यांची धावाधाव सुरु होते. खरे तर, याचे नियोजन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी केले पाहिजे आणि वर्षाअखेरीस धावाधाव टाळली पाहिजे. अर्थात हे माहित असूनही अनेक करदाते आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत चांगल्या गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असतात. प्राप्तिकरातून सूट मिळण्यासाठी पात्र असलेल्या गुंतवणूक पर्यायांपैकी एक महत्त्वाचा आणि अलीकडील काही वर्षांत लोकप्रिय झालेला पर्याय म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ‘इएलएसएस’! डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडाचे सर्व फायदे देणारे, फक्त तीन वर्षांचा लॉक-इन पिरियड असणारे हे फंड दीर्घकाळात उत्तम परतावा देतात. या फंडाचा लॉक-इन पिरियड तीन वर्षे आहे म्हणजेच गुंतवणूक केल्यापासून कमीतकमी तीन वर्षे गुंतवणूकदाराला या फंडातील गुंतवणूक काढून घेता येत नाही. अर्थात प्राप्तिकराची बचत करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या इतर पर्यायांच्या तुलनेत हा लॉक-इन पिरियड कमी आहे. त्यामुळे अधिक प्राप्तिकर द्याव्या लागणाऱ्या आणि थोडी अधिक जोखीम घेण्याची तयारी असलेल्या करदात्यांचा अशा फंडांकडे ओढा दिसून येतो. सध्याच्या दराप्रमाणे ज्या गुंतवणूकदारांना ३० टक्के दराने प्राप्तिकर द्यावा लागतो, असे करदाते या फंडात दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून एका वर्षात सुमारे ४५,००० रुपये प्राप्तिकर आणि त्यावरील अधिभार वाचवू शकतात.

या श्रेणीतील गेली अनेक वर्षे चांगली कामगिरी करीत असलेला एक ‘इएलएसएस’ फंड म्हणजे एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड! ३१ मार्च १९९३ रोजी स्थापन झालेला हा फंड ३१ मार्च २०२२ रोजी २९ वर्षे पूर्ण करून तिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. सुरवातीला या फंडाचे नाव ‘एसबीआय मॅग्नम टॅक्स गेन’ असे होते. पण वर्ष २०२० मध्ये त्याचे नामकरण ‘एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड’ असे झाले.

दमदार कामगिरी

या फंडाने स्थापनेपासून कामगिरीत सातत्य राखले आहे. फंडातील गुंतवणूकदारांची संख्या नियमितपणे वाढल्यामुळे बाजारभावाप्रमाणे या फंडाची सध्याची मालमत्ता १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. या एकूण मालमत्तेपैकी कमीतकमी ८० टक्के मालमत्ता ही शेअर बाजारातील विविध कंपन्यांचे शेअर आणि संबंधित पर्यायांमध्ये गुंतवली जाते, तर उर्वरित रक्कम तुलनेने सुरक्षित पर्यायात गुंतवली जाते. या फंडाची एकूण गुंतवणूक व्यूहरचना पाहिल्यावर लार्ज कॅप डायव्हर्सिफाइड फंडातील गुंतवणुकीचे सर्व फायदे देण्याची क्षमता या फंडाकडे आहे, असे लक्षात येईल. सध्या या फंडाची ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे, त्या प्रमुख पाच कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत- आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा.

या फंडाच्या गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास लक्षात येते, की एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे २६ टक्के गुंतवणूक वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये आहे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये १० टक्के गुंतवणूक आहे, तर तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये ८ टक्के गुंतवणूक आहे.

ज्या गुंतवणूकदाराने या फंडात फंड स्थापनेच्या वेळी (वर्ष १९९३) एक लाख रुपये गुंतवले होते, त्याच्या गुंतवणुकीचे आजचे बाजारमूल्य सुमारे ६५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. २९ वर्षांच्या मोठ्या कालावधीत सातत्याने चांगली कागमिरी करीत राहणे, हे कोणत्याही म्युच्युअल फंडासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळेच प्राप्तिकराची बचत आणि दीर्घकाळात चांगला परतावा हे दोन फायदे मिळविण्यासाठी गुंतवणूकदार अशा फंडांची निवड करतात.

एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंडाच्या ३१ मार्च रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त फंडाच्या टीमला आणि गुंतवणूकदारांना हार्दिक शुभेच्छा!

(लेखक म्युच्युअल फंडाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com