विद्यार्थ्यांची इको-फ्रेन्डली मोटार

सकाल वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

वाढती लोकसंख्या आणि शाश्वत जीवनशैलीसाठी पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांची मागणी सातत्याने वाढत आहे.

मुंबई : वाढती लोकसंख्या आणि शाश्वत जीवनशैलीसाठी पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांची मागणी सातत्याने वाढत आहे. पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करण्याकडे कल वाढत आहे.

त्या उद्देशाने मुंबईच्या के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही मोटार विकसित केली आहे. या मोटारीचे नामकरण ईटीए (ईटा) असे करण्यात आले असून मोटारीला ८० सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर गॅसोलिन इंजिन, सेंट्रिफ्युजल क्‍लच, चेन आणि स्प्रॉकेट यंत्रणा जोडण्यात आली आहे. बेंगळूरु येथे होणाऱ्या आगामी ‘शेल मेक द फ्युचर लाइव्ह इंडिया २०१९’ मध्ये या मोटारीचे सादरीकरण करत २५० किमी प्रतिलिटरची सरासरी गाठण्याचे विद्यार्थ्यांनी उद्दिष्ट ठेवले आहे. १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत शेल टेक्‍नॉलॉजी सेंटर बेंगळूरु (एसटीसीबी) येथे होणाऱ्या कार्यक्रमात १४ जणांचा चमू या गाडीच्या प्रतिकृतीचे सादरीकरण करणार आहे.

ही चमू गॅसोलिन श्रेणीत सहभागी होणार आहेत. ‘शेल मेक द फ्युचर लाइव्ह इंडिया’चा भाग असलेली ‘शेल इको-मॅरेथॉन’ ही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. अनेक देशात तिचे आयोजन केले जाते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन करून शाश्‍वत विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ही स्पर्धा करते.

web title : Eco-Friendly Motor of Students

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco-Friendly Motor of Students