डीएसकेंच्या पहिल्या बायकोचा‌ 'तो' बंगलाही 'ईडी'च्या ताब्यात

गौरव मुठे 
Tuesday, 27 August 2019

पुणे: ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेलय डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसके’ समूहाच्या आणखी काही मालमत्ता असल्याचे काही दिवसांपपूर्वीच उघड झाले होते. आता डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योती दीपक कुलकर्णी यांच्या नावे धायरी येथील डीएसके विश्वमधील बंगला देखील आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) ताब्यात घेण्यात आला आहे. डीएसके विश्वमध्ये सायंतारा सोसायटीमध्ये असलेल्या बंगल्याबाहेर आता ईडीने नोटीस देखील लावली आहे. अंदाजे पाच हजार स्क्वे.फूट प्लॉटवर तीन हजार स्क्वे.फूटवर बांधकाम करण्यात आले आहे. या बंगल्याची किंमत सुमारे 5 कोटी असल्याचे बोलले जात आहे.

पुणे: ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेलय डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसके’ समूहाच्या आणखी काही मालमत्ता असल्याचे काही दिवसांपपूर्वीच उघड झाले होते. आता डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योती दीपक कुलकर्णी यांच्या नावे धायरी येथील डीएसके विश्वमधील बंगला देखील आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) ताब्यात घेण्यात आला आहे. डीएसके विश्वमध्ये सायंतारा सोसायटीमध्ये असलेल्या बंगल्याबाहेर आता ईडीने नोटीस देखील लावली आहे. अंदाजे पाच हजार स्क्वे.फूट प्लॉटवर तीन हजार स्क्वे.फूटवर बांधकाम करण्यात आले आहे. या बंगल्याची किंमत सुमारे 5 कोटी असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय धायरीतील डीएसके विश्वमध्ये अनेक इमारती अजूनही अर्धवट बांधलेल्या स्थितीत उभ्या आहेत. 

 ‘डीएसके’ समूहाची 904 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आधीच जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, विमा योजना, गुंतवणूक आणि बँकांतील रोख ठेवींचा समावेश आहे. ठेवीदारांकडून मिळविलेल्या पैशावर मोठय़ा प्रमाणावर चंगळ केल्याची माहिती ‘ईडी’च्या तपासातून पुढे आली आहे. 

डीएसकेंच्या पुण्यात मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता आहेत. धायरी येथे कुलकर्णी यांच्या १२ मालमत्ता आहेत. याबरोबरच पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी या ठिकाणीही मालमत्ता आहेत. या जागा मोक्‍याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांची किंमत बाजारभावानुसार दोनशे ते तीनशे कोटी रुपयांच्या असण्याची शक्यता आहे 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, त्यांच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर यांना अटक केली होती. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडे 33 हजार ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. दरम्यान, सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाच्या आदेशानंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. तेव्हा कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED attaches properties of DS Kulkarni