BitCoin | 'हा' देश बनवणार जगातील पहिली 'बिटकॉइन सिटी'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bitcoin

'हा' देश बनवणार जगातील पहिली 'बिटकॉइन सिटी'!

जगभरात बिटकॉइन नावाच्या क्रिप्टोकरन्सीने सर्वांना वेड लावलं. या सारख्या आणखी चलनात लोकांनी पैसे गुंतवले आहेत. त्याशिवाय अनेक देशांमध्ये बिटकॉइनसारख्या डिजिटल चलनांना प्रमोट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणार करण्यासाठी काही देशांनी यासंबंधी निर्णय जारी केले आहेत.

डिजिटल चलन बिटकॉइन कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारणारा एल साल्वाडोर हा पहिला देश आहे. आता हा देश जगातील पहिले बिटकॉइन शहर बनवण्याच्या तयारीत आहे. एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. देशाच्या बिटकॉइन सिटीला सुरुवातीला बिटकॉइन बाँडद्वारे निधी दिला जाईल. बुकेले यांना आशा आहे की ही योजना देशातील क्रिप्टोकरन्सीवरील बेट दुप्पट करेल.

'आम्ही 2022 मध्ये निधी देणं सुरू करू. हे बाँड 2022 मध्ये उपलब्ध होतील,' असं एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी सांगितलं. नायब बुकेले म्हणाले की, बिटकॉइनसाठी नियत असलेल्या शहराकडून मूल्यवर्धित कर वगळता कोणताही कर आकारला जाणार नाही. साल्वाडोर या 'प्लॅन्ड सिटी'साठी निधी उभारण्यासाठी बिटकॉइनद्वारे $1 अब्ज बाँड जारी करण्यात येतील.

या वर्षी सप्टेंबरमध्ये, एल साल्वाडोर बिटकॉइन स्वीकारणारा जगातील पहिला देश बनला. 7 सप्टेंबर रोजी एल साल्वाडोरने बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता दिली. एल साल्वाडोरने बिटकॉइन स्वीकारल्यानंतर, इतर अनेक देशांनीही डिजिटल चलनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅराग्वे, अर्जेंटिना, ब्राझील आणि पनामा देखील कायद्याच्या कक्षेत आणून क्रिप्टोकरन्सीच्या व्यापारावर चर्चा करत आहेत.

युरोपीय देश युक्रेनने बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणि नियामकांच्या कक्षेत आणण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे. वर्षभरापूर्वी या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून त्याला देशातील २८२ पैकी २७६ खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

BitCoin म्हणजे काय?

Bitcoin हे एक डिजिटल चलन आहे. सामान्य भाषेत त्याला इंटरनेट चलन असंही म्हणतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही अधिकार, बँक किंवा सरकार नाही. हे पीअर टू पीअर नेटवर्क बेसवर काम करतं. अशा प्रकारे ते जागतिक चलन बनलं आहे.

loading image
go to top