esakal | एक दिवसात 50 हजार कोटींनी वाढली संपत्ती; जगातील सर्वात श्रीमंतामध्ये थेट तिसऱ्या स्थानी
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk.

मागील काही वर्षांपासून एलन मस्क बऱ्याच कारणांनी सातत्याने चर्चेत राहिले आहेत.

एक दिवसात 50 हजार कोटींनी वाढली संपत्ती; जगातील सर्वात श्रीमंतामध्ये थेट तिसऱ्या स्थानी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन: SpaceX आणि Teslaचे प्रमुख एलन मस्क आता जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर झाली आहे. मागील काही वर्षांपासून एलन मस्क बऱ्याच कारणांनी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपुर्वी मस्क यांना कोरोनाची लागणही झाली होती. अलीकडेच मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार ऍस्ट्रॉनटला अवकाशात पाठवले आहे.

जेफ बेजोस प्रथम क्रमांकावर-
ब्लूमबर्ग बिलिनेअर निर्देशांकाच्या यादीत 185 अब्ज डॉलरसह जेफ बेजोस प्रथम क्रमांकावर आहेत. बिल गेट्स 129 अब्ज डॉलर, तर एलन मस्क 110 अब्ज डॉलर, मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर मालमत्तेसह चौथ्या आणि बर्नार्ड अर्नाल्ट 102 अब्ज डॉलर मालमत्तेसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

सोमवारी पहाटे SpaceX कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटनेअटलांटिक महासागरावरून उड्डाण केलं. यामध्ये मायकल एस हॉपकिन्स, शॅनन वॉकर आणि NASAचे व्हिक्टर जे ग्लोव्हर आणि सोईची नोगुची हे जपानी अंतराळवीर आहेत.

SpaceXने चार अंतराळवीरांना (astronauts) पृथ्वीच्या कक्षेत नेले आहे आणि सुमारे 27.5 तासांच्या कक्षेत प्रवास केल्यानंतर अंतराळवीर ISSच्या गोदीत पोहचतील पुढे त्यांचा ISSमध्ये सहा महिन्यांचा मुक्काम असेल.

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी सुरू केलेल्या SpaceX या रॉकेट कंपनीने बांधलेल्या आणि चालवल्या जाणाऱ्या क्रू ड्रॅगन अंतराळयानाचे (Crew Dragon spacecraft) पहिले उड्डाण यशस्वी झाल्याची माहिती नासाने दिली आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top