खूशखबर: पीएफचा व्याजदर झाला 8.65 टक्के

वृत्तसंस्था
Thursday, 21 February 2019

नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी लोकांना फायदा मिळवून देणारे पाऊल उचलत कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफवर ( प्रॉव्हिडंट फंड) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार 2018-19 या वर्षासाठी सध्याचा 8.55 टक्के असलेला व्याजदर वाढवून तो 8.65 टक्के इतका करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केल्यानांतर याचा देशातील सहा कोटी सदस्यांना फायदा मिळणार आहे.   आर्थिक वर्ष 2016 नंतर प्रथमच  वाढ करण्यात आली आहे.   

व्याजदरात वृद्धी करण्याबाबत कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात 0.10 टक्के वाढ करण्यावर एकमत झाले होते. ईपीएफओच्या या नव्या निर्णयांमुळे सुमारे 6 कोटी खातेधारकांना फायदा मिळणार आहे. नियमानुसार ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ ( सीबीटी) ही ईपीएफओची निर्णय घेणारी प्रमुख समिती व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय घेत असते. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या सदस्यांनी व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तो प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हे मंजूर दरानुसार व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EPFO interest rate raised to 8.65% from 8.55%, first hike since FY 16