नोकरदारांना मोठा झटका, EPFO ​​ने कमी केले व्याजदर; वाचा सविस्तर

EPFO
EPFOesakal

भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींवरील व्याजदरात वाढ होण्याच्या अपेक्षेने लोकांना मोठा झटका बसला आहे. ईपीएफओने व्याजदर वाढवण्याऐवजी कमी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे, जो 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता.भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज चार दशकांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. 1977-78 नंतरचा हा सर्वात कमी आहे, जेव्हा EPF व्याजदर 8 टक्के होता. (epfo interest rate reduced)

एका सूत्राने सांगितले की, “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ने शनिवारी झालेल्या बैठकीत 2021 साठी EPF वर 8.1 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. CBT ने 2020-21 साठी EPF ठेवींवर 8.5 टक्के व्याजदर मार्च 2021 मध्ये निश्चित केला होता

EPFO
दोन वर्षांनंतर PM नरेंद्र मोदी आईच्या भेटीला; सचिन सावंत म्हणतात..

आता CBT च्या निर्णयानंतर, 2021-22 साठी EPF ठेवीवरील व्याजदर मंजूरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे याला परवानग दिल्यानंतरच EPFO हे ​​व्याजदर लागू करते.

EPFO
बेलारुसमध्ये रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच; कुजल्याने येतेय दुर्गंधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com