नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! पीएफवरील व्याजदर घटणार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी असून पीएफवरील व्याजदर घटण्याची शक्यता आहे. ईपीएफओकडून पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी असून पीएफवरील व्याजदर घटण्याची शक्यता आहे. ईपीएफओकडून पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच पीएफच्या व्याजदरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा व्याजदर कपातीचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस, लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेच्या समस्या वाढत असताना दुसरीकडे बचतीवरील व्याजदर कमी होत असल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गुंतवणूकीवरील परतावा सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे भविष्य निर्वाह निधी व्याजदर कमी करण्याचा विचार केला जात आहे. हे व्याज आधी ८.६५ टक्के होतं, जे मार्च महिन्यात कमी करुन ८.५० टक्के करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा व्याजदर कमी करण्याचा विचार केला जात आहे. पीएफच्या व्याजदराबाबत निर्णय घेण्यासाठी ईपीएफओ वित्त विभाग, गुंतवणूक विभाग आणि लेखापरीक्षण समिती बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये ईपीएफओ किती व्याजदर देऊ शकते, याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. 
----------------
...तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे; 'या' नेत्याने केली मागणी
----------------
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार
----------------
दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीला नव्या ८.५ टक्के व्याजदराबाबत घोषणा करण्यात आली होती. परंतु, यासाठी वित्त मंत्रालयाकडून अद्याप मंजूरी मिळालेली नाही. वित्त मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच कामगार मंत्रालयाकडून याबाबत सूचित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नोकरी करणाऱ्यांसाठी पीएफचे महत्व असते. भविष्यातील अर्थिक तरतुदींसाठी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी हा फंड महत्वाचा मानला जातो. या फंडामध्ये कर्मचाऱ्याचे आणि कंपन्यांचे पैसै जमा होत असतात. त्याचबरोबर त्यावर चांगले व्याजही मिळत असते. त्यामुळे भविष्यातील अर्थिक तरतुदीच्या दृष्टीने हा फंड महत्वाचा असतो. मात्र, आता या फंडावर मिळणाऱ्या व्याजदारत कपात होणार असल्याने सर्व नोकदार वर्गासाठी ही चिंतेची बाब आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EPFO mulls rate cut on PF deposits

Tags
टॉपिकस
Topic Tags: