EPFO: पीएफ खात्याशी संबंधित हे आहेत 6 फायदे

असे घेऊ शकता आर्थिक लाभ
EPFO: पीएफ खात्याशी संबंधित हे आहेत 6 फायदे

कर्मचाऱ्यांना पीएफ सुविधा पुरवण्याचे काम कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) करते. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराचा छोटासा हिस्सा पीएफ खात्यात जमा करण्यासाठी कापला जात असतो. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा मार्ग अवलंबला जातो.

प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे PF खाते असते. ज्यात ती व्यकी आणि त्याची कंपनी (नियोक्ता) ईपीएफओमध्ये तुमच्या नावाने जे खाते असते, अशा नि्श्चित खात्यात ठराविक रक्कम जमा करते. यात तुमची कंपनी (नियोक्ता) तुमच्या पगारातून काही रक्कम कापून (सध्या 12 टक्के) पीएफ ऑफिसमध्ये जमा करते. शासनाकडून ही ठराविक रक्कम निश्चित केली जाते. यात कंपनीही (नियोक्ता) आपला हिस्सा निश्चित रकमेमध्ये (आपल्या सीटीसीचा काही भाग) जमा करते. याचे फायदे आणि माहिती जाणून घेणे गरेजेचे आहे.

EPFO: पीएफ खात्याशी संबंधित हे आहेत 6 फायदे
बाजार मंदीत असताना या शेअर्सची करा खरेदी; तज्ज्ञांचा सल्ला

मोफत विम्याची सुविधा - कर्मचाऱ्याने पीएफ खाते उघडताच तो आपोआप विमाधारक होतो. यात कर्मचाऱ्यांना 6 लाख रुपयांपर्यंतचा विमा एम्प्लॉय डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI scheme) नुसार असतो. जर ईपीएफओच्या सक्रीय सदस्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशीत व्यक्तीला किंवा वारसाला 6 लाख रूपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. केंद्र सरकार आणि कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे लाभ देतात.

करात सूट - जर तुम्हाला करात सूट हवी असेल तर पीएफ हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. जुन्या करप्रणालीमध्ये करात सूट उपलब्ध आहे. पण, नवीन कर प्रणालीत अशी कोणतीही सुविधा नाही, हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ईपीएफ खातेधारक त्याच्या पगारावर 12 टक्के कर आयकर कलम 80 सी नुसार वाचवू शकतात.

सेवानिवृत्तीनंतर मिळणार पेन्शन-  जर तुम्ही सलग 10 वर्षे पीएफ खाते चालू ठेवले असले तर तुम्हाला आजीवन कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच सलग 10 वर्षे नोकरी करत राहयची. कारण तुमच्या नोकरीतूनच पीएफ खात्यात पैसे जमा होणार आहे.  तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एक हजार रुपये पेन्शन Employees’ Pension Scheme 1995 नुसार मिळत राहील.

निष्क्रिय खात्यावर व्याज- कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय पीएफ खात्यावरही व्याज दिले जाते. तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा आहेत पण खाते  तीन वर्षांपासून निष्क्रीय असेल तर त्या जमा केलेल्या रकमेवरही 2016 मध्ये कायद्यात केलेल्या बदलांनुसार, व्याज दिले जाते. यापूर्वी अशा तीन वर्षे निष्क्रीय असलेल्या पीएफ खात्यावर व्याज देण्याची तरतूद नव्हती.

ऑटो ट्रान्सफरची सोय- तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या यूएएन नंबरद्वारे तुम्ही तुमच्या एकापेक्षा अधिक पीएफ खात्यांना जर तुम्ही नोकरी बदलत असाल तर) लिंक करू शकता. नोकरी बदलल्यावर पीएफचे पैसे ट्रान्सफर करणे आता सोपे झाले आहे. नवी नोकरी लागल्यावर इपीएफच्या पैशांवर दावा करण्यासाठी वेगळा फॉर्म 13 भरण्याची आता गरज नाही. आते ते आपोआप होईल. फॉर्म 13 एेवजी इपीएफओने फॉर्म 11 हा नवीन फॉर्म सादर केला आहे. ऑटो ट्रान्सफरच्या सर्व सुविधांसाठी हा फॉर्म वापरता येईल.

गरजेवेळी पैसै काढता येणार- गरजेच्या वेळी काही पैसे तुम्हाला पीएफ फंडातून काढता येतात, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यामुळे तुम्ही कर्ज घेण्यापासून वाचू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com