पैशाच्या वाटा: संधी ईटीएफ गुंतवणुकीची!

ETF investment opportunities
ETF investment opportunities

केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीकरण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील 'महारत्न' आणि 'नवरत्न' समजल्या जाणाऱ्या 10 कंपन्यांचा समावेश असणाऱ्या 'सीपीएसई ईटीएफ'मधून 2014 मध्ये 3,000 कोटी रुपये उभे केले होते. यातीलच एकूण 6,000 कोटी रुपये एवढ्या रकमेची 'फॉलो ऑन ऑफर' आता आली आहे, जी सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आकर्षक वाटत आहे. याची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत-

1) 'निफ्टी'च्या (पीई रेशो=22, प्राईस-पीबी रेशो=3.1) तुलनेत 'सीपीएसई इंडेक्‍स'चे मूल्यांकन (पीई रेशो-12, प्राइस-पीबी रेशो=2) स्वस्त आहे. त्यामुळे पुढील काळात यात चांगला परतावा मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच भविष्यकाळात जेव्हा सार्वजनिक कंपन्यांची विक्री होईल, तेव्हाही त्यांच्या वाढलेल्या मूल्यांकनाचा लाभ यातील गुंतवणूकदारांना मिळू शकेल. 2) संरक्षण, पायाभूत सुविधा, ऊर्जा अशा क्षेत्रांमधील ऑइल इंडिया, कोल इंडिया, ओएनजीसी, गेल, आरईसी, भेल अशा निवडक 10 कंपन्यांचा या 'सीपीएसई इंडेक्‍स'शी निगडित असलेल्या 'ईटीएफ'मध्ये समावेश आहे. 3) यातील कंपन्यांचे डिव्हिडंड यिल्ड 4 टक्के आहे, जे निफ्टीच्या 1.3 टक्‍क्‍यांच्या तुलनेत जास्त आहे. 4) 2014 मध्ये सुरु केलेल्या 'सीपीएसई ईटीएफ'ने सातत्याने 'निफ्टी'पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 'निफ्टी'ने 9.3 टक्के, तर 'सीपीएसई ईटीएफ'ने 15.2 टक्के परतावा दिला आहे, 5) करलाभ: हा इक्विटी ईटीएफ असल्याने एक वर्षानंतरच्या विक्रीवर 'कॅपिटल गेन टॅक्‍स' पडणार नाही. 6) तरलता: इतर 'ईटीएफ'प्रमाणे 'एनएसई' किंवा 'बीएसई'वर तो शेअर ब्रोकरकडून कधीही विकता येईल. 7) फक्त 'एनएफओ'च्या काळात म्हणजे (18 ते 20 जानेवारी) हा ईटीएफ 5 टक्के सवलतीने मिळणार आहे. 8) गुंतवणुकीसाठी किमान रक्कम 5,000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये आहे. 9) या 'ईटीएफ'चा एक्‍स्पेन्स रेशो 0.065 टक्के आहे, जो इतर म्युच्युअल फंड योजनांसाठी असलेल्या 2.25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. 10) इतर म्युच्युअल फंडांसाठी जरी डीमॅट खाते आवश्‍यक नसले, तरी हा 'ईटीएफ' असल्याने यासाठी डीमॅट खाते आवश्‍यक आहे. 11) म्युच्युअल फंड सल्लागारामार्फत किंवा डायरेक्‍ट अशा दोन्ही पद्धतीने 'एनएफओ'च्या काळात खरेदी करता येईल. नंतर मात्र तो फक्त स्टॉक एक्‍स्चेंजच्या माध्यमातूनच घेता येईल. 12) रिलायन्स म्युच्युअल फंड हे याचे व्यवस्थापक आहेत.

यापुढील काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग 6 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त राहील, यावर तज्ज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे शेअर बाजारामधील एखाद्याच कंपनीत जोखमी घेण्यापेक्षा यातील जोखीम कमी असल्याने 'सीपीएसई ईटीएफ'चा जरूर विचार करावा.
- अरविंद शं. परांजपे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com